बिलोली / नांदेड – शहरातील भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची नांदेड येथे मुलाखती संपन्न झाल्या यावेळी राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे,नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष डॉ संतुकराव हांबर्डे, देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश जितेशभाऊ अंतापुरकर, नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड,माजी नगराध्यक्ष यादवरावजी तुडमे यांच्या उपस्थितीत मुलाखती संपन्न झाल्या मागील दशकापासून भारतीय जनता पक्षाची पालखी वाहणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या मुलाखती घेऊन पक्षासाठी आपले असलेले योगदान ही कार्यकर्त्याच्या कामाची पावती आहे आपण कामाला लागावे पक्ष श्रेष्ठी आपणास न्याय देईल बिलोली नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवला जाईल अशी शाश्वती देण्यात आली यावेळी ६७ इच्छुक उमेदवारांसह नगराध्यक्ष पदाचे इच्छुक उमेदवार विजयकुमार कुंचनवार तसेच इंद्रजित तुडमे यांची उपस्थिती होती.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















