मंगळवेढा – मंगळवेढा ते दामाजी कारखाना व ब्रह्मपुरी हायवे ते दामाजी कारखाना रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, तुटलेली डांबरी पृष्ठभाग आणि पावसाळ्यात चिखलमय झालेले मार्ग यामुळे नागरिक आणि वाहनचालकांना ऊसाने भरलेली वाहाने रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागताे आहे.दरम्यान हा रस्ता राज्य मुख्यंमत्री महामार्ग विभागाकडे आसुन याकडे त्यांचे आक्षम्य दूर्लक्ष आहे.
या रस्त्यावरून बठाण, उचेठाण, मुढवी, ब्रह्मपुरी आदी गावांतील नागरिक,शेतकरी, विद्यार्थी, दामाजी कारखाना कामगार या रस्त्यावरून नेहमीच ये जा करतात . उसाची वाहने, ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्या दररोज ये-जा करतात. रस्त्यावर पावसाने मोठ मोठे खड्डे पडले असून खड्डे चुकवण्याच्या नादात अनेकदा वाहनाचे अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. माघील महिन्यात खड्डाचुकवन्याच्या नादात माेठा ट्रक रसत्यावर पलटी झाल्याची घटना घडली हाेती.
तदनंतरही हा रस्ता आद्याप दूरूस्त केला नाही.शाळेच्या शिक्षकेलाही याच रसत्यावरून जावे लागते खड्याच्या त्रासाला कंटाळून त्यांनी चक्क ब्रह्पुरी मार्गे ऊचेठाण शाळेवर येने पसंत केले आहे. दामाजी कारखाना ते मंगळवेढा हे १० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी पाऊण तासाचा वेळ लागत आहे. खड्ड्याच्या सम्राजामुळे मणक्याचे, पाठीचे आजार जडत आसल्याच्या तक्रारी आहेत.तसेच वाहनाचे नुकसान ही होत आहे. खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, अनेकांचे प्राण धोक्यात आले आहेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र डागडुजीच्या नावाखाली केवळ थातूर-मातूर काम करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
दरवर्षी पावसाळा आला की रस्ता आणखी चिखलात आणि खड्ड्यांत गडप होतो. पण तीन वर्षांपासून प्रशासनाने डोळेझाक केली आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास शेतकरी नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत .















