अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील हैद्रा येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत ख्वाजा सैफुल मुलुख चिस्ती रहमत दर्ग्याच्या ऊर्स निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती हजरत ख्वाजा सैफुल मुलुख चिस्ती दर्गा कमिटीचे चेअरमन एमडी रफिक सिराजोद्दीन मुजावर यांनी दिली आहे.
हजरत ख्वाजा सैफुल मुलुख चिस्ती रहमत दर्ग्याच्या उरूस निमित्त दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संदल गंध मिरवणूक ही कर्नाटकातील करजगी गावातून पाटील घरापासून काढण्यात येणार असून या संदल मिरवणुकीचा हैद्रा येथे समारोप होणार आहे. दिनांक १७ नोव्हेंबर रोजी चिराग दीपोत्सव संपन्न होणार आहे. रात्री नऊ वाजता दिल्ली येथील कवालान इरम चिस्ती व राजस्थान अजमेर येथील कव्वाल नौशाद शोहला यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक १८ नोव्हेंबर रोजी जियारत प्रसाद वाटप कार्यक्रम होणार आहे. तरी हिंदू मुस्लिम व सर्व धर्मीय भाविकांनी ऊर्स निमित्त दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन हजरत ख्वाजा सैफुल मुलुख चिस्ती कादरी दर्गा कमिटीचे चेअरमन एमडी रफिक सिराजोद्दीन मुजावर यांनी केले आहे.
या उरूस निमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी व्हाईस चेअरमन बंदेनवाज मुजावर, सेक्रेटरी वकील मुजावर , ट्रस्टी याकूबसाब मुजावर, जैनुद्दीन मुजावर , आयुब मुजावर, बंदेनवाज दस्तगीर बाशा मुजावर , अहमद मुजावर , अ. रऊफ मुजावर , बंदेनवाज सिराजोद्दीन मुजावर आदी परिश्रम घेत आहेत.
























