मंगळवेढा – शहरातून एका 9 वर्षीय अल्पवयीन मुलास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी आईच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,यातील फिर्यादी निशा हेगडे वय 26 वर्षे,रा.विटभट्टीजवळ सांगोला रोड,मंगळवेढा यांचा अल्पवयीन मुलगा यश पांडुरंग हेगडे वय 9 वर्षे,हा दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वा. खेळायला जातो म्हणून घरातून निघून गेला.तो परत आलाच नाही.कुटुंबियांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला.मात्र तो मिळून न आल्याने फिर्यादीची खात्री पटली की कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले असावे असे दिलेल्या फिर्यादीत नमून करण्यात आले आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे -रंग,सावळा,चेहरा-गोल,नाक-सरळ,उंची-3 फुट,अंगात नेसणेस गुलाबी रंगाचा शर्ट व निळया रंगाची फुलपँट,शिक्षण- पहिली,भाषा-मराठी अशा वर्णनाचा मुलगा कोणाच्या निदर्शनास आल्यास तपासिक अंमलदार तथा पोलिस उपनिरिक्षक विजयकुमार पिसे (मोबा.8600088810) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Views: 11