रत्नागिरी – रत्नागिरी येथे 12 डिसेंबर 25 रोजी राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये कुमठे प्रशालेचा आरमान अशपाक शेख ह्याने पाच किलोमीटर चालणे या खेळ प्रकारांमध्ये तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
मार्गदर्शक शिक्षक विक्रम पवार व क्रीडा शिक्षक संजय घोडके यांचा संस्थेचे विश्वस्त जयकुमार माने, स्वाती माने, प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे, यांनी अभिनंदन केले.


















