नांदेड – श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेत विष्णुपुरी नांदेड येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी विद्यार्थी परीक्षेच्या काळात ताण तणावाखाली असतात या बाबींचा विचार करून संस्थेचे संचालक डॉ. मनेश कोकरे यांचे मार्गदर्शना खाली मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पुष्पा गायकवाड यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले.
श्री गुरुगोविंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील देवगिरी, नंदगिरी आणि गोदावरी वसतिगृहातील निवासी विद्यार्थ्यांना संचालक डॉ. मनेश कोकरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली रेक्टर डॉ.सावरकर सर व वसतीगृह वार्डन यांनी वसतिगृहातील निवासी विद्यार्थिनींसाठी ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता कृष्णा मेस रिक्रिएशन हॉलमध्ये एक दिवसीय, मार्गदर्शन वर्ग,चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
या मार्गदर्शन वर्गात,चर्चासत्रात दोन महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थीनीना मार्गदर्शन करण्यात आले, ज्यात “परीक्षेचा ताण व्यवस्थापन” आणि “वसतिगृह स्वच्छता” या विषयांचा समावेश होता. यावेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पुष्पा गायकवाड यांनी विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थीनीना परीक्षेच्या तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि परीक्षेच्या काळात सकारात्मक मानसिक दृष्टिकोन राखण्यासाठी प्रभावी तंत्रांवर मार्गदर्शन केले. त्यांनी चांगल्या आरोग्यासाठी आणि राहणीमानासाठी वसतिगृह परिसरात स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व देखील पटवून दिले. या चर्चासत्रास संचालक डॉ. मनेश कोकरे यांचे मार्गदर्शनाखाली रेक्टर डॉ.सावरकर, डॉ. प्रणिता बालवे व डॉ.पौर्णिमा तळेले उपस्थित राहून डॉ.पुष्पा गायकवाड यांचे आभार मानून परीसंवादाचा समारोप केला .
सदरील चर्चासत्र यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वसतिगृहाचे रेक्टर डॉ.सावरकर सर यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी परिश्रम घेतले


















