सोलापूर – जिल्हा परिषद समाजकल्याण कडील २० टक्के समाज कल्याण निधी व पाच टक्के दिव्यांगकल्याण निधीमधून सन २०२५ — २६ करीता तालुक्याकडून पात्र यादीमधून सोडत पद्धतीने लाभार्थी निवड गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी शिवरत्न सभागृह जिल्हा परिषद, सोलापूर येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीणकर यांच्या उपस्थित पार पडली.
यावेळी मागासवर्गीय शेळीगट करीता ९५, मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन ३३, मागासवर्गीयांना सोलर ड्रायर ६३, मल्टीपर्पझ पल्चरायझर ८३, महीलांना शिलाई मशीन १४० असे एकूण ४२२ इतके मागासवर्गीय लाभार्थींची अंतिम निवड करण्यात आली. तसेच तितक्याच प्रमाणात योजनानिहाय ४२२ इतक्या प्रतिक्षाधीन लाभार्थीची निवड करण्यात आली. दिव्यांगकल्याण योजनेतून दिव्यांगांना शेळीगट ७१, दिव्यांगांना झेरॉकस मशीन २२, दिव्यांगांना पिठ गिरणी ३५, असे एकुण १२८ इतके लाभार्थी अंतिम करण्यात आले. तसेच तेवढेच १२८ इतक्या दिव्यांग लाभार्थ्यांची प्रतीक्षाधीन यादीमध्ये निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, शिवानंद मगे, एस. एस. गायकवाड, सचिन सोनकांबळे , मल्लिकार्जून माळगे , होटकर व तालुकास्तरीय कर्मचारी उपस्थित होते.
















