Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करुन शांतेत निवडणूक पार पाडावी

तरुण भारतbyतरुण भारत
November 14, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर  –  राज्यातील  नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ दिनांक ४नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकी  करिता नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून, निवडणूक प्रक्रियेशी संबधित राजकीय पक्ष, पदाधिकारी, इच्छुक उमेदवार, अधिकारी व कर्मचारी यांनी आदर्श आचारसहिंतेचे पालन करावे व शांतेत निवडणूक पार पाडावी असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा निडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर यांनी केले आहे.

निवडणूक प्रक्रिया निप:क्ष व निर्भयपणे पार पाडण्यासाठी व आदर्श आचारसंहितेची काटेकोर पालन करण्यासाठी शहरात भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके आणि व्हिडिओ सर्वेक्षण पथके कार्यान्वीत करण्यात आली  आहेत. तसेच निवडणूक प्रक्रियेयसठी  विविध कक्षाची स्थापना करण्यात आली असून, आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबतही आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. 

निवडणुकीच्या निकालापर्यंत आचारसंहिता प्रभावी राहील. निवडणुकीसाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून शांत, पारदर्शक व सुरळीत निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी- कर्मचारी यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी सिमा होळकर यांनी सांगितले.

पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण १८ प्रभागात ९५ हजार ५५९ मतदार असून यापैकी ४७ हजार १९४ पुरुष तर ४७ हजार ३४७ स्त्री मतदार आणि इतर १८ मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ७५० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये ९७ मतदान केंद्रावर ०१ केंद्राध्यक्ष, ०३ मतदान अधिकारी ०१ शिपाई व ०१ पोलीस ५८२ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्रासाठी दहा राखीव पथके नेमण्यात आली आहेत.दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी व्हिलचेअर, रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा  मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
——————-

पुरुषांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त –
पंढरपूर नगर परिषदेमध्ये एकूण १८ प्रभागात ९५ हजार ५५९ मतदार असून यापैकी ४७ हजार १९४ पुरुष तर ४७ हजार ३४७ स्त्री मतदार आणि इतर १८ मतदार आहेत.
——————-

निवडणूक प्रक्रियेसाठी ७५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती –
निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी ७५० अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये ९७ मतदान केंद्रावर ०१ केंद्राध्यक्ष, ०३ मतदान अधिकारी ०१ शिपाई व ०१ पोलीस ५८२ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
——————-


असा आहे निवडणूक कार्यक्रम –
नामनिर्देशन पत्र दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० यावेळेत पंढरपूर नगरपरिषद सभागृह येथे स्विकारण्यात येणार आहेत. नामनिर्देशन पत्राची छाननी १८ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून,  नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी दि.१९ ते २१ नोव्हेंबर २०२५  या कालावधी असेल. दि. २६ नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप व अंतीम उमेदवार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Post Views: 65
Previous Post

जिल्ह्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर कुष्ठरुग्ण शोध अभियान 

Next Post

‘लावण्या’ कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ थाटात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

'लावण्या' कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ थाटात संपन्न

ताज्या बातम्या

अंगणवाडी इमारतींसाठी नवा वाढीव आराखडा मंजूर 

June 4, 2026

स्थायी समितीची सभा; विकासकामांचा आढावा, जमा-खर्च पत्रकांचे अवलोकन

June 4, 2026

पायाजवळ थुंकल्याचा जाब विचारल्याने लोखंडी सळईने मारहाण – दोघे जखमी ; चौघांवर गुन्हा दाखल

June 4, 2026

कर्ज फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आण म्हणून विवाहितेचा छळ – पतीसह तिघांवर गुन्हा

June 4, 2026

माहिती अधिकारात अर्ज करतो का म्हणून शिवीगाळ करून विटेने  मारहाण – एकावर गुन्हा दाखल

June 4, 2026

रस्त्यावर पाडून लाथाबुक्याने बेदम मारहाण – सहा जणांवर गुन्हा दाखल

June 4, 2026

मार्केट यार्ड मधून एच एफ मोटरसायकल चोरीस

June 4, 2026
एमआयटी बार्शीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

एमआयटी बार्शीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893361

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697