Thursday, June 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीर्थक्षेत्र विकास आधाडीकडून नगराध्यक्षपदासाठी डाँ.प्रणिता भालकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

तरुण भारतbyतरुण भारत
November 17, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरपूर नगरपालिका निवडणूकीसाठी तिर्थक्षेत्र विकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून डॉ.प्रणिता भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज रविवारी दाखल केला आहे. दुसरीकडे  बंडखोरी होऊ नये याची परिचारकांकडून दक्षता घेण्यात येत असल्याने भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत अद्याप सस्पेन्स राखण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच सोमवारी भाजपाचा उमेदवार जाहीर होवून तो उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे परिचारकांच्या गोटातून सांगितले जात आहे. 
पंढरपूर नगरपालिका निवडणूकीचे पडघम जोरदार वाजू लागलेले आहे. या निवडणूकीत सत्ताधारी परिचारकांच्या भाजप विरोधात विरोधी गटाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे आव्हान असणार आहे.

भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी वैशाली वाळुजकर, साधना भोसले आणि शामल शिरसाट या तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान शनिवारी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंढरपूर दौऱ्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांच्या निवडणूका भाजपा स्वबळावर आणि कमळ चिन्हावर लढविणार असल्याचे सांगितले होते. या बरोबरच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची भाजपाकडून नावे देखील कन्फर्म करण्यात आली असून ती मुंबई येथे श्रेष्ठींकडे पाठविण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. त्यामुळे पंढरपूर पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून कोणाचे नाव कन्फर्म करण्यात आले आहे या बाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे.


दुसरीकडे नगराध्यक्षपदाच्या नावांबाबत बंडखोरीच्या भितीमुळे भाजपाकडून सस्पेन्स राखला जात असल्याचे देखील सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच सोमवारी भाजपाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार  जाहीर  होवून नगराध्यक्षपदासाठी ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. एकंदरीतच पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे दररोज नवीन नवीन राजकीय घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे.


दुसरीकडे पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधात सर्व विरोधी मंडळींना एकत्र करून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार आहे. या आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून डॉ.प्रणिता भालके यांनी आपला उमेदवारी दाखल केला आहे. यामुळे पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी असा सामना रंगणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
————————–
डॉ. भालकेंना निश्चितच यश मिळणार : खासदार शिंदे
खासदार प्रणिती शिंदे या रविवारी पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या होत्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना  त्यांनी सांगितले की, पंढरपूर पालिकेच्या निवडणूकीसाठी भाजप विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले असून या निवडणूकीसाठी विरोधकांकडून तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक लढविण्यात येणार आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवारी तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून यांना देण्यात आली आहे.पंढरपूर शहरांमध्ये माजी आमदार (कै.) भारतनाना भालके यांना मानणारा मोठा वर्ग आहे. या बरोबरच भालके गटाचे काम देखील चांगले आहे.त्यामुळे या निवडणुकीत प्रणिता भालके यांना निश्चितच यश मिळणार असल्याचा विश्वास देखील यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.
———————

आमदार पाटील आणि आमदार खरे निवडणूकांपासून दूर –
पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणूकीचे पडघम सध्या जोराने वाजू लागलेले दिसत आहेत. गेल्या दोन, तीन महिन्यापासून विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष तथा माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, मोहोळचे आमदार राजु खरे यांनी पंढरपूर नगरपरिषदेतील परिचारकांची गेल्या चाळीस वर्षाची सत्ता संपुष्टात आणण्याच्या आणाभाका केल्या होत्या. त्यासाठी परिचारक विरोधकांची मोट देखील बांधण्यासाठी आमदार अभिजीत पाटील, मनसेचे दिलीप धोत्रे यांनी पुढाकार घेत विरोधी गटाची जुळवा जुळव देखील केलेली होती.या मंडळींकडून पंढरपूर नगरपालिका निवडणूकांसाठी बैठकांचा सपाटा देखील सुरु होता. मात्र मोहोळचे आमदार राजु खरे हे निवडणूकीची घोषणा झाल्यापासूनच अलिप्त दिसत आहेत. तर भाजपाचे नेते प्रविण दरेकरांच्या दौऱ्यानंतर आमदार अभिजीत पाटील हे देखील निवडणूकी पासून अंतर ठेवून असल्याची चर्चा आहे.


Post Views: 213
Previous Post

राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची सोलापूर येथील सामुदायिक विवाह सोहळ्यास उपस्थिती

Next Post

एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहारा वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांसोबत साजरा केला रणवीरचा वाढदिवस…!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहारा वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांसोबत साजरा केला रणवीरचा वाढदिवस...!

ताज्या बातम्या

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

सेंट्रल बँक अक्कलकोट शाखा; नवे व्यवस्थापक ओंकार चेऊलवार रुजू

June 4, 2026
माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीतून प्रस्थान

June 4, 2026
लिटिल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना बूट खरेदीची सक्ती

लिटिल फ्लावर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पालकांना बूट खरेदीची सक्ती

June 4, 2026

उन्हापासून बचाव साठी 100  वंचित,बेघर,निराधार गरिबांना अत्यावश्यक किट वाटप

June 4, 2026

समाजकल्याण विभागातील मनोज म्हेत्रे निलंबित 

June 4, 2026

युवासेनेच्या वतीने रविवारी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन

June 4, 2026

मोहोळ तालुक्यातील कथित भेसळयुक्त दूध व्यवसायाची चौकशी करण्याची मागणी

June 4, 2026
सोलापूरला लवकरच मिळणार आधुनिक नाट्यगृहाची भेट

सोलापूरला लवकरच मिळणार आधुनिक नाट्यगृहाची भेट

June 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0893552

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697