इस्लापुर / नांदेड – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरकरनगर ईस्लापूर . येथे डेपुटेशनच्या नावावर रोज अध्यापणासाठी शिक्षक बदलून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा भविष्य अंधारात जात असल्याकारणाने जो पर्यंत शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देत नाही तो पर्यंत शाळा उघडणार नाही म्हणून संविधान दिनी सविधानाचे वाचन करूण सदरील शाळेला येथील पालकांनी कुलुप लावले आहे .
किनवट तालुक्यातील इस्लापुर येथील जिल्हा परिषद प्रार्थमिक शाळेत गेल्या महिन्यापासून शाळेवर डेपुटेशनच्या नावावर रोज दोन दिवसात शिक्षक बदलुन येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यामुळे विद्यार्थाचे कोणतेच बेसिक पुर्ण होत नसल्याने येथील पालकांनी मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड, व गट शिक्षणाधिकारी किनवट यांच्याकडे कायमस्वरूपी शिक्षक द्या या मागणीचे निवेदन दिले होते परंतु त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज दिनांक २६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास संविधाना दिनाच्या दिवशी संविधानाचे वाचन करूण शिक्षण विभागाच्या या ढिसाळ कारभाराला वैतागुन अखेर पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे .
शाळा १ ते ४ असुन किनवट तालुक्यात सदरील शाळा प्रथम क्रमांकावर असून येथे पट संख्या ४५ आहे .येथील विद्यार्थी वेगवेळ्या परीक्षेत गुणवत्ता प्राफ्त करुण राज्य व देश पातळीवर गेलेले आहे आशा शाळेकडे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे जनतेत शिक्षण विभागाच्या विरोधात तिव्र नाराजी वक्त होत आहे

















