Friday, September 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त घेतलेल्या किल्ला स्पर्धांचा पारितोषिक वितरण

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पंढरपूर – येथील कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दीपावली निमित्त घेतलेल्या किल्ला स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पांडुरंग भवन येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली सतरा वर्षे पंढरीत कार्यरत असणाऱ्या कलासाधना सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यावर्षी छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व इतिहासाचा प्रसार व प्रचार व्हावा या उदात्त हेतूने भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात अक्षय बडवे पाटील यांच्या ईशस्तवनाने झाली. सदर स्पर्धा शालेय व खुल्या अशा दोन गटात घेतल्या होत्या. रोख रक्कम, संस्थेचे मानचिन्ह, सहभाग प्रमाण पत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. हा कार्यक्रम एस. के. एन. कॉलेजचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांच्या अध्यक्षतेखाली व पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर पटवर्धन, तसेच श्रीपांडुरंग अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष अनिरुद्ध बडवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

यावेळी बोलताना डॉ.करांडे आपल्या भाषणात म्हणाले की,  कलासाधनाचा हा नवीन उपक्रम म्हणजे शिवरायांच्या विचारधारांचा खरा दीपोत्सव साजरा झाला असेच म्हणावे लागेल. तसेच शिवजयंती साजरी करतांना सामाजिक सेवा करणा-या सेवाभावी संस्थांना मदत व भेटी देऊन तिथे साजरी करावी. भविष्यात अशा सर्व उपक्रमाला जास्तीत मदत माझ्या कडून मिळेल.

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुधीर पटवर्धन आपल्या भाषणात म्हणाले की शिवरायांचा वापर फक्त निवडणुकी पुरताच राजकारण करण्यासाठी केला जातो. पण असे न करता किल्ला स्पर्धा  वक्तृत्व स्पर्धा  इत्यादी विविध माध्यमातून महाराजांचे विचार बाल मनापासून खोलवर रुजले पाहिजेत.  तसेच मोबाईल म्हणजे आफुची गोळी झाली आहे, तिचा वापर कमी होण्यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत. शिवरायांनी किल्लेबांधताना हिरोजी इंदलकर या स्थापत्य अभियंत्याने अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडली होती, हे सांगताना किल्ला बांधताना जागेची निवड महाराज अगदी मायक्रोमॅनेजमेंटचा विचार करुन करीत असत. कलासाधना संस्थेला भविष्यात सर्व प्रकारची मदत करणार असल्याचे त्यांनी विषद केले.

सदर किल्ला स्पर्धेचे परिक्षण इतिहास अभ्यासक तुकाराम चिंचणीकर, एडव्होकेट आशुतोष अनिलराव बडवे पाटील, इंटेरियम डेकोरेटर अभियंता सुमेर काळे, कलाशिक्षक प्रद्युम्न कमठाणकर यांनी समर्थपणे केले. त्याबद्दल स्पर्धेचे सचिव ज्ञानेश्वर मोरे यांच्या हस्ते परिक्षकांचा सत्कार  करण्यात आला. वेळी कलासाधनाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बडवे महाजन व डॉक्टर बसवराज सुतार यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शिवरायांची अश्वारूढ प्रतिमा देउन करण्यात आला. परिक्षक एडव्होकेट आशुतोष बडवे यांनी किल्ला स्पर्धेचे परिक्षण कसे केले जाते हे अतिशय लालीत्यपूर्ण ओघवत्या भाषा शैलीत विषद केले. यापुढेही विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे श्रीकांत बडवे महाजन यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सदस्य रणजीत पवार यांनी करुन दिला.

संस्थेचे कार्याध्यक्ष अमरसिंह चव्हाण यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या मागील व भविष्यातील कार्याचा धावता आढावा घेतला.सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत खजिनदार राजेंद्र माळी यांनी केले. यावेळी यास्पर्धेला प्रायोजकत्व दिलेल्या स्कॉलर मार्केटिंगचे प्रमुख महेश मोहीकर व एस के एन संस्थेच्या पदाधिका-यांचा यथोचित सत्कार संस्थेचे सदस्य प्रा.मंदार परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धेत शालेय गटात प्रथम क्रमांक विभाहून कु.श्रेया माऊली डांगे व रेणुकामाता मंडळ, द्वितीय क्रमांक विभागून श्रेयश शिंगाडे व साजरा राऊत, तर तृतीय क्रमांक विभागून चिन्मय देशपांडे,वेदांग बोर्खेडकर व सोहमपेटकर यांनी प्राप्त केला तर खुल्या गटात प्रथम क्रमांक विभागून वरद विवेक बडवे व संकल्प प्रतिष्ठान, द्वितीय क्रमांक विभागून कु. अमोल वाखारकर व ओम जाधव,  तृतीय क्रमांक स्वराज्य मावळे गृप अंश व आर्य  कोठाडिया आणि शिवप्रेमी तरुण मंडळ यांनी प्राप्त केला.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत प्रभाकर बडवे महाजन, प्रा.विनायक परिचारक सर, , अभिराज बडवे, अमृतभाई पेनूरकर, प्रा. राजेंद्र मोरे ,राजेश अंबिके, ज्ञानेश मोरे, डॉ.किरण बहिरवाडे, अनंता नाईकनवरे, महेश देशपांडे, शिवाजी यादव, नारायण बडवे, बसवराज बिराजदार, राजकुमार आटकळे, महेश अंबिके, राजकुमार शहा आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मंदाकिनी देशपांडे यांनी केले तर आभार अरिहंत भाई कोठाडिया यांनी मानले. या कार्यक्रमास परिसरातील अनेक नागरीक पालक, स्पर्धक व विद्यार्थी उपस्थित होते.

Post Views: 73
Previous Post

कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश

Next Post

डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना सर्व जगात श्रेष्ठ

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

डॉ . बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना सर्व जगात श्रेष्ठ

ताज्या बातम्या

सोलापूर क्रिकेटला नवी उंची ; ५० वर्षात प्रथमच बीसीसीआयचे सामने होणार #viral #solapurnews

September 11, 2026

सोलापुरात सकल मराठा समाजाने केला रास्ता रोको #viral #solapurnews #aajsolapur #latestnews

September 11, 2026

मित्राने वाढदिवसानिमित्त वडिलांचा व्हिडिओ भेट दिला आमदार कोठेनी भावुक होत केला शेअर

September 11, 2026

सोलापूर विकास मंचचे एअरपोर्ट डायरेक्टरना निवेदन #solapurnews

September 11, 2026

प्रवीण दरेकरांनी जरांगेंना म्हणाले #viral #marathinews #news

September 11, 2026

शाळेत दहा वर्षीय विद्यार्थिनीला सापसदृश प्राण्याचा दंश; शाळेच्या हलगर्जीपणावर संताप #viral#solapur

September 11, 2026

यंदा गणराय असणार बारा दिवस पंचांगकर्ते मोहन दातेंची माहिती#solapurnews #news #viral

September 11, 2026
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातर्फे पुणे येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय डाळिंब परिषदेचे यशस्वी आयोजन.

September 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1191237

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!