Monday, July 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“येळकोट घे सदानंदचा येळकोट” श्री क्षेत्र बाळेत श्री खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीनिमित्त धार्मिक विधी संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – तीर्थक्षेत्र बाळेत श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा प्रारंभ आज चंपाषष्ठीला मोठ्या उत्साही आणि धार्मिक वातावरणात झाला. पहाटे पाच वाजता काकडा आरती करण्यात आली. तद्नंतर अभिषेक आणि महापूजा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर श्रींच्या दर्शन घेण्यासाठी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांनी भरीत रोडग्याचा नैवेद्य अर्पण करत बेल भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट घोषणा देत मंदिरास प्रदक्षिणा घातल्या. यावेळी मंदिर परिसरात तसेच श्रींच्या गर्भ गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट साकारण्यात आली होती. मंदिराच्या आग्रभागी “शिवमल्हार” फुलातील सजवलेले अक्षरे भक्तांचे लक्ष वेधून घेत होती.

         

दरम्यान, मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी ही चंपाषष्ठी अथवा मार्तंडभैरव षष्ठी म्हणून सर्वत्र साजरी होत असते. मार्गशीर्ष महिन्याला शुक्रवार (दि. २१ )पासून प्रारंभ झाला. याच दिवसापासून मार्तंडभैरव षड‌्यात्रोत्सवासही प्रारंभ झाला. या मासाचा पहिला दिवस ‘खंडोबाची नवरात्री’ आणि ‘देवदिवाळी’ म्हणून साजरा झाल्यानंतर सहा दिवसांच्या षड‌्रात्री उत्सवाचा समारोप बुधवार (दि. २६) चंपाषष्ठीला खंडोबा पूजनाने झाली आहे. ज्या परिवारांमध्ये खंडोबा कुलदैवत आहे तिथे चंपाषष्ठीनिमित्त कुलाचार-कुलधर्म करण्याची परंपरा असते. तत्पूर्वी पाच दिवस अनेक घरांमधील सदस्य उपवास करतात. सहाव्या दिवशी खंडोबाची षोडशोपचार पूजा करून महानैवेद्य दाखवला गेला. यावेळी देव्हाऱ्यात अखंड नंदादीप लावला जातो. अशी माहिती मंदिराचे पुजारी सागर पुजारी यांनी दिली.     

         तीर्थक्षेत्र बाळेत खंडोबा मंदिरात तसेच शहर परिसरातील ईतर श्रीखंडोबा मंदिरांत उत्सव साजरा होत आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. मल्हारी मार्तंड हा भगवान शंकराच्या अवतारापैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जात आहे. घरोघरी मार्तंड भैरवाची म्हणजे मल्हारी मार्तंड देवतेची विधिवत पूजा करून भंडारा उधळत तळी उचलण्याचा विधी केला जातो. 

     यात्रा काळात मंदिर समितीकडून गर्भ गाभारा व सभा मंडपामध्ये आकर्षक अशा रंगबेरंगी सुवासिक फुलांची सजावट करण्यात आली होती. अबालवृद्ध भाविकांना अन्नदान प्रसाद,दर्शनासाठी मुख दर्शन व गाभारा दर्शन रांग , कमांडो फोर्स, सुरक्षेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही कॅमेरा, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने मंदिर परिसर मध्ये आरोग्याच्या दृष्टीने औषध फवारणी, साफ सफाई, पालखी मार्ग व परिसरात अतिरिक्त पथ दिवे, बसेस,फिरते शौचालयची व्यवस्था करण्यात आली आहे.पोलिस आयुक्त यांच्या कडून चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी सांगितले.

श्री खंडोबा देवाच्या यात्रेस चंपाषष्ठीपासून प्रारंभ 

श्री खंडोबा देवाच्या यात्रा कालावधीत पहाटे ५ वाजता काकड आरती, तर सकाळी ८ वाजता आणि रात्री ७वाजता महापूजा व अभिषेक करण्यात येणार आहे. दिवसभर जागरण गोंधळ, वाघ्या-मुरळी नृत्य, तळी-भंडारा उचलणे, भंडारा खोबरे उधळणे वारू सोडणे, नवस फेडणे, जावळ काढणे यांसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात.यात्रेत विविध धार्मिक कार्यक्रमांची पहाटेपासून रात्रीपर्यंत रेलचेल असते.

– गणेश पुजारी, श्री खंडोबा देवस्थान मंदिराचे पुजारी 

 

चंपाषष्ठीचे महत्त्व

भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणि या दोन राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतल्याचे पुराणात सांगितले जाते. हे युद्ध अवघ्या सहा दिवसांतच संपले. याच दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो.

 

चंपाषष्ठी पूजा विधी

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते षष्ठी तिथीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. या सहा दिवसांत मार्तंडदेवाजवळ नऊ तेलाचे दिवे लावले जातात. तसेच विधिवत खंडोबाची पूजा करून आरती म्हटली जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी धान्यांचे पीठ (ठोंबारा) गव्हाचा रोडगा आणि वांग्याचे भरीत नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. काही परिवारात प्रथेनुसार पुरणपोळी किंवा श्रीखंडाचाही नैवद्य दाखवला जातो. तसेच दिवे ओवाळणीची देखील पद्धत आहे.यात्रेच्या पुढील प्रत्येक रविवारी सायंकाळी श्रींची पालखी, घोडा, नंदीध्वज याचासह मिरवणूक निघते. मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक रविवारी यात्रा भरणार असून दि.३० नोव्हेंबर ,७ डिसेंबर,१४ डिसेंबर २०२५ या तीन रविवारचा समावेश आहे.

Post Views: 108
Previous Post

संविधान समजून घेणे ही काळाची गरज – अपर्णा कुचेकर

Next Post

सिंहगड महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सामूहिक उद्देशिका वाचन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सिंहगड महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सामूहिक उद्देशिका वाचन

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1002942

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!