पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रथम विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश किरगत सर यांच्या हस्ते डाॅकटर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वाघमारे सर ,जमदाडे सर,जाधव सर,मगर सर,घोडके मॅडम, आठरे मॅडम, देवकर मॅडम व इतर शिक्षक बांधव,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर पिलीव बाजारपेठेतून संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावेळेस मुलांनी संविधानाच्या घोषणा दिल्या. संविधान दिनानिमित्त विद्यालयात निबंध स्पर्धा,चिञकला, गायन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा पार पाडण्यासाठी वाघमारे, झाडे, ऐवळे, मुरकुटे, आठरे व इतर सर्वच शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले. फोटो _ पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात संविधान दिनानिमित्त अभिवादन करताना .





















