—————————————————
बिलोली – बिलोली जवकास गेल्या पंहारा दिक्सापासून चालु असलेल्या बिलोली नगरपालीका निवडणुकीच्या प्रक्रियेतील मतदानाचा टप्पा आला पूर्ण झालेला आहे. झालेल्या मतदानापैकी एकुण ७५.९१ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये पुरुषांची मतदार संख्या ४८५२ तर स्त्रियांची मतदार संख्या ४६७८ आहे. सदर निवडणुकीत सहायक निवडणुक अधिकारी बी. जी. मिठ्ठेवाड यांनी महत्वपूर्ण सेवा बजावून प्रक्रिया पार पाडली.
या ठिकाणी २० नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासून अनेक घडामोडीमुळे लक्ष लागून राहिलेल्या बिलोली नगरपरिषद निवडणूकीत काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार आ मराठवाडा जनहित पार्टी यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या सर्व २० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत तर शिंदेच्या शिवसेनेने नगराध्यक्षपदासह चार नगरसेवक पदावर उभे करून आपले नशीच अजमावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार राबवून आपल्याला मत कसे मिळेल यासाठी सर्वध उमेदवारांनी रााांदिवस मेहनत होती.
अखेर नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २ डिसेंबन रोजी प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पहली १० प्रभागातील २० मतदान केंद्र उभारण्यात आले होते. या २० केंद्रावर शहरातील एकूण १२ हजार ६०२ मतदारांपैकी ५६७ एवढया मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला आहे. दुसरीकडे उमेदवारी मागे घेण्यालय कारणावरून झालेल्या राड्यामुळे सतर्क झालेल्या पोलिस प्रशासनाने मतदानाच्या पुर्वसंध्येपासूनच शहरातील सर्व मतदान केंद्रांसह कडेकोट बंदोबस्त ठेवाला होता. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी बिलोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
एकंदरीत बिलोली नगर परिषदेसाठी कालची मतदान प्रक्रिया अगदी सुरळीतपणे पार पडली असली तरी, पुढचे काही दिवस उमेदवारांना झोप येईल असे वाटत नाही कारण, काल झालेल्या मतदानाची १९ दिवसानंतर २१ डिसेबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीना लाडक्या बहिणीनी आपली मते कोणाच्या झोळीत टाकले हे उघड होणार आहे. असे असले तरी कुणाला सहानुभुती मिळणार, कुणाचे डोके ठिकाण्यावर येणार याकडे मात्र अख्मा शहर वासियांचे लक्ष लागून आहे.

















