
सांगोला – आलेगाव (ता.सांगोला) येथील प्रा.डॉ.रामचंद्र यादव यांना के.एस.आय पब्लिकेशन संस्था आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तपणे लोकमान्य टिळक ग्रंथालय, वाई (जि.सातारा) येथे आयोजित केलेल्या ५ व्या राज्यस्तरीय मिरग नक्षत्र कवी संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ डोलारे, स्वागताध्यक्ष शशिकांत कोचळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज साहित्य पुरस्कार प्रधान करण्यात आला. यावेळी उद्घाटक विलास खरात, डॉ.श्रीकांत पाटील, सचिन वाघमारे, योगेश यादव, ऐश्वर्या यादव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या थोरात-काळे, दिपक पवार यांनी केले.
Post Views: 9