
सुमारे सहा वर्षापासून सुरु असलेल्या येथील नगरपालिकेच्यासर्व्हे नं.४०७५ मधील आरक्षण क्रमांक ५३ या ठिकाणी भव्य आणि आकर्षकअशी नामसंकीर्तन सभागृहाची इमारत उभी झालेली आहे. किरकोळ कामेअजूनही बाकी आहेत. एकुण ६५ ते ७० कोटी रुपयांचा या संपुर्ण इमारतीचा आराखडा असुन राज्यशासनाकडून आत्ता दोन टप्प्यात पर्यंत ४४ कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत. अजूनदेखील संपुर्ण इमारतीचे काम पुर्णत्वास जाण्यासाठी १५ ते १८ कोटी रुपयांची आवश्यकताआहे. त्यामधील सुमारे साडेसात कोटी रुपये जरी आत्ता त्वरीत मिळाले तरी येत्या आषाढीयात्रेच्या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होवू शकते. त्यामुळे राज्य शासनाकडून या इमारतीच्या उर्वरित कामासाठी निधी मिळणारका ? आणि येत्या आषाढी एकादशीला तरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचालोकार्पण सोहळा होणार का ? असा सवाल येथील नाट्यरसिक प्रेषकांकडूनउपस्थित केला जात आहे. राज्याचे तत्
कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनीविठ्ठलच्या पंढरीनगरी मध्ये भव्य असे नामसंकीर्तन सभागृह उभारले जावे या भावनेतून ‘नामसंकीर्तन सभागृहाच्या कामास मंजुरी देवून त्यासाठी अर्थमंत्री म्हणून भरघोस निधीची तरतूद देखील केलेली होती. पंढरपूर पालिकेने यानाट्यगृहासाठी दोन ते अडीच एकर जागा देखील उपलब्धकरुन दिलेलीआहे. या नामसंकीर्तन सभागृहासाठी आत्ता पर्यंत दोन टप्प्यात सुमारे ४४ ते ४५ कोटींचा खर्च करण्यात आलेला आहे. त्यामुळेच या नामसंकीर्तन सभागृहाची अतिशय देखणी वास्तू पंढरपूरात आकारास आलेली आहे.
या नामसंकीर्तन सभागृहाची किरकोळ सध्या सुरू असून १५ ते १८ कोटी रुपयांचा निधी मिळाला तर प्रत्यक्ष कामाला गती प्राप्त होवू शकते आणि या इमारतीचे काम पूर्ण होवून दिमाखदार लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येत्या आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न होवू शकतो.
——————–
चौकट ( एकंदरीतच इमारतीची अशी आहे रचना )
या नामसंकीर्तन सभागृहाची तीन मजली इमारत पाहताक्षणी रसिक प्रेषकांची मने जिंकून घेते. या संपुर्ण इमारतीचे बांधकाम हेसुमारे १ लाख २० हजार चौरस फुटाचे आहे. इमारतीच्या प्रवेशाच्या ठिकाणी अतिशय सुंदर असेश्री विठ्ठलाचे मंदिर उभारण्यात आले आहे. पहिल्या मजल्यावर सुमारे १ हजार २०० प्रेषक बसतील असे सभागृह बांधण्यात आलेले असून तब्बल चार हजार स्क्वेअर फूटाचे व्यासपीठ (रंगमंच ) तयार करण्यात आलेले आहे. दुसऱ्या मजल्यावर ५०० चौरस फुटांची आर्ट गँलरी तर तळमजल्यावर पार्किग आणि डायनिंग हाँल तयार करण्यात आलेला आहे. या बरोबरच नामसंकीर्तन सभागृहात साऊंड सिस्टिम व लाइटिंगची आधुनिक पद्धतीने व्यवस्था करण्यात आली आहे.
——————–
( टप्पा एक व दोनसाठी राज्य शास
नाकडून मिळाला भरीव निधी )
नामसंकीर्तन सभागृह टप्पा क्रमांक
एक मध्ये मंजुरी निविदा रक्कम २६ कोटी ९२ लाखयामध्ये पूर्ण आरसीसी काम,फेरो सिमेंट, दगड काम, अंडरग्राउंड वॉटर टँक असे कामाचे स्वरूप होते तेपुर्णत्वास गेलेल आहे. . तर टप्पा क्रमांक २ मध्ये मंजूर निविदा रक्कम २५ कोटी ८८ लाख यामध्ये सिलिंगकाम, लाइटिंग काम, एअर कंडिशन, फायर काम, कंपाउंड वॉल, ट्रान्सफारमेंट सिस्टीम, स्टेज लायजिंग, सेटिंग अरेंजमेंट आणि लिफ्ट असे कामाचे स्वरूप होते.
————————-
चौकट : ( टप्पा तीन साठी निधीची आवश्यकता )
ही संपुर्ण इमारत साकारण्यासाठी आणखीन देखील १५ ते १८ कोटी रुपयांचीआवश्यकता आहे. या इमारती मधील तसेच इमारतीच्या परिसरातील छोटी,मोठी कामे अद्यापही बाकीआहेत. त्यामुळे सुमारे सहा ते सात वर्षापासून सुरु असलेल्या या इमारतीचे बांधकाम अद्यापही रखडलेले आहे.
———————–
कोट
पंढरपुरातील नामसंकीर्तन सभागृह हे महाराष्ट्रातील अतिशय सुंदर व भव्य असे नाट्यगृह म्हणून निश्चितच ओळखले जाईल. या सभागृहामुळे पंढरपूरच्या वैभवात निश्चितच भर पडली आहे. नाट्यरसिक तसेच नागरिकांच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. येत्या आषाढी एकादशीच्या मुहुर्तावर हे नामसंकीर्तन सभागृह सुरु व्हावे अशी अपेक्षा आहे.
Post Views: 9