पंढरपूर – येथील तालुका पोलिसांनी रात्रीच्या गस्त दरम्यान पुण्यातून बेपत्ता असलेल्या दोन अल्पवयीन बालकांना शोधून काढुन त्यांना सुखरुप पणे पालकांच्या स्वाधिन केल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या बाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक मुजावर यांनी सांगितले की, १० जून २०२६ रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास उरुळी कांचन पोलीस स्टेशन पुणेग्रामीण येथील पोलिसांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे अनवलीफाटा येथे सोळा वर्षे वयाची दोन अल्पवयीन मुले घरात किरकोळ कारणावरून भांडण करून उरळीकांचन येथून सोलापूरच्या दिशेने बेंगलोरला निघून जात आहेत तरी सदर दोन्ही अल्पवयीन मुलांचा शोध घेऊन ताब्यामध्ये घ्यावे अशी माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी शोध मोहीम राबवली.
दरम्यान अनवली फाटा या ठिकाणी जाणाऱ्या ट्रक चालकांकडे विचारपूस केलीअसता पुणे बेंगलोर जाणाऱ्या ट्रक जवळ दोन अल्पवयीन मुले पंढरपूर तालुका पोलिसांनामिळून आल्यानंतर पोलिसांनी त्यांची नाव पत्ते खात्री करून उरळीकांचन पोलिसांना संपर्क केला त्या मुलाकडे विचारपूस केली असता सदर दोन्ही मुलांनी सांगितले की किरकोळ कारणावरून घरामध्ये वडिलांनी रागावल्यामुळे ती दोन्ही मुलं पुण्यातून घर सोडून बेंगलोर कडे जात होते. रस्त्यामध्ये ट्रक चालक हे वाहनांमध्ये अनोली फाटा येथे चाकातील हवा चेक करण्यासाठी थांबला असतातिथे ते मुलं ट्रक मधून उतरून दुसऱ्या गाडीची वाट बघत थांबले होते अशी माहिती मिळाली. त्यानंतर त्या मुलांना पंढरपूर तालुका पोलिसांनी कौन्सिलिंग करून समजावून सांगितले व त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन त्यांची जेवणाची सोय केलीत्याच्या नातेवाईकाला संपर्क केला नातेवाईक आणि उरुळी कांचनची पोलीस बोलावून घेऊन पहाटे पोलिसांच्या ताब्यामध्ये दोन्ही मुलांना सुखरूपपणे दिल्याचे त्यांनी सांगितले.
ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पीएसआय विक्रम वडणे, सहाय्यकफौजदार सुधाकर हेंबाडे, ठाणे अंमलदारपोलीस हवालदार मंगेश रोकडे व चालक पोलीस कॉन्स्टेबल रामभाऊ चाटे यांनी पार पाडली.
——————-
चौकट: ( पंढरपूर तालुका पोलिसांचे मानले आभार )
दरम्यान अशा पद्धतीने घरातील लहान मुले किरकोळ रागावल्याचा कारणावरूनएवढे मोठे पाऊल घेऊन पाऊल उचलून अनोळखी माणसा बरोबर लिफ्ट घेऊन ट्रकमध्ये बेंगलोरकडे चालले होते ही अत्यंत मनाला हेलकावणारी गोष्ट आहे परंतु पंढरपूर तालुका पोलिसांनी वेळीच तत्परता दाखवून दोन्ही मुलांचे मन परिवर्तन करून त्यांना त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले आहेत. नातेवाईकांनी मुलांना ताब्यात घेऊन पुण्याकडे उरुळी कांचनचे पोलीस रवाना झालेले आहेत. मुलांना नातेवाईकांच्या ताब्यात दिल्यानंतर नातेवाईकांनी मुलांना पाहून पंढरपूर तालुका पोलिसांचे आभार मानले.
Post Views: 10