सोलापूर – 12 टायर कंटेनरच्या धडकेत जखमी झालेल्या वळसंग येथील एका पंक्चर वाल्याचा उपचारादरम्यान आज बुधवारी सकाळी मृत्यू झाला .
युवराज बाळु शेळके ( वय-44 वर्षे, रा-रांजनगाव गणपती ,ता. शिरूर , जि.पुणे ) असे मयत पंक्चर दुकानदाराचे नाव आहे .
युवराज शेळके हे दि.8 रोजी 3.30 वा चे सुमारास सोलापुर अक्कलकोट महामार्ग वरील वळसंग गावाजवळ (ता.द. सोलापुर ) चारचाकी गाडीचे टायरचे पंक्चर काढत असताना वरिल ठिकाणी मागुन येणा-या 12 टायर ट्रक कंटेनर ने ( क्र एपी39 -डब्ल्यू एम-7688 ) त्यांना धडक दिली होती .या धडकेत डोक्याला व हात – पायाला व चेह-याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने त्यांना सुरुवातीस येथील शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सीएनएस हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते .तेथे त्यांचा उपचारा दरम्यान आज बुधवारी सकाळी साडेदहा वाजता मृत्यू झाला .
Post Views: 11