Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात दत्त जयंती उत्सव संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
December 5, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील पुरोहित मंदार महाराज पुजारी प्रथमेश इंगळे व विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख व सत्संग महिला भजनी मंडळातील भजन करी व उपस्थित स्वामी भक्तांच्या मुखातूनदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या नामजपाने अवघा आसमंत दुमदूमला. निमित्त होते श्री दत्त जयंती उत्सवाचे.

         अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात आज गुरुवारी श्री दत्त जयंती उत्सव अपार श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.

        दत्त जयंती उत्सवाच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात व श्री वटवृक्ष मंदिरात आज सर्वत्र उत्साहपुर्ण भक्तीमय वातावरण दिसले. पहाटे ४ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मोहनराव (गुरुजी) पुजारी यांच्या अधिपत्त्याखाली, मंदिर समितीचे चेअरमन व मा.नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती संपन्न झाली. त्यानंतर स्वामी भक्तांना दर्शनाकरिता मंदिर खुले करण्यात आले. भक्तांच्या वाढत्या गर्दीमुळे स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळी साडे अकरा वाजता श्रींचा नैवेद्य आरती सोहळा मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला.

दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत निघालेल्या स्वामी भक्तांची स्वारी या काळात अक्कलकोटी विसावली. यामध्ये पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, घाटकोपर, भांडुप-मुंबई, बार्शी, भातम्बरे, इत्यादी परगावाहून येणाऱ्या पालखी व दिंडीचा सहभाग होता. या दिंडी व पालखी सोबत आलेल्या सर्व स्वामी भक्तांची भोजन प्रसादाची व निवासाची सोय देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली होती. पहाटे ५ वाजल्यापासून ते रात्री १० पर्यंत दिवसभरात हजारो स्वामीभक्तांनी दत्तावतारी स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन तृप्त झाल्याची भावना व्यक्त केली. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीच्या वतीने सर्व स्वामी भक्तांना रांगेत व प्रसंगी टप्प्या टप्प्याने दर्शनास सोडण्यात आले. 

भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरिता मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराचे कर्मचारी, सेवेकरी यांनी परिश्रम घेतले. तसेच मंदीरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये व स्वामी भक्तांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आले होते. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने दत्त जन्म आख्यान, वाचन, व दत्तसंप्रदायिक भजन होऊन सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहनराव पुजारी व मंदार महाराज, मोहित महाराज यांच्या हस्ते पाळणा पूजन व प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन असंख्य स्वामी भक्तांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळा देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, उज्वलाताई सरदेशमुख, कौशल्या जाजू, शकुंतला कटारे, सुरेखा तेली, सुवर्णा जाधव,

गिरीश पवार, ऋषिकेश लोणारी, मोहन जाधव, जयप्रकाश तोळणूरे, सागर गोंडाळ, महेश मस्कले, अमर पाटील, बाळासाहेब घाटगे, अक्षय सरदेशमुख, प्रदीप हिंडोळे, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी, सचिन हन्नूरे, सागर दळवी, लखन सुरवसे, रमेश होमकर, सचिन पेटकर, ओंकार महाडीक, सागर गोंडाळ, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार, महेश मस्कले, बंडोपंत घाटगे,

श्रीशैल गवंडी, चंद्रकांत गवंडी, दर्शन घाटगे, समर्थ स्वामी, ज्ञानेश्वर भोसले, आकाश चुंगीकर, तुषार मोरे, आदीत्य गवंडी, आकाश शिंदे आदीसह भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त सदगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय ! दिंगबरा दिंगबरा श्रीपाद वल्लभ दिंगबर च्या जयघोषात राज्यातील अनेक भागातुन पायी पालखी दिंडी सोहळे दत्त जयंती निमित्य दाखल झाले होते .  . वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर , बुधवार पेठ समाधी मठ, गुरुमंदिर भारत गल्ली , स्टेशन रस्ता राजेराय मठ ‘ विसावा कट्टा जेऊर रोड ‘श्री स्वामी समर्थ अन्नछत मंडळ येथे विविध धार्मिक कार्यक्रम जयंती उत्सव पाळणा कार्यक्रम संपन्न झाला .  श्री दत्त जयंती निमित्य वटवृक्ष स्वामी मंदिर , बुधवार पेठ समाधी मठ येथे आकर्षक विविध फुलांनी मंदिर सजविण्यात आल्याने मंदिरची शोभा आणखिनच वाढली .

. प्रसादिक वस्तु नारळ ‘पुष्पहार, अगरबत्ती ‘ धुप , पेढे ‘ बत्ताशे , चुरमुरे , अंगठी ‘ मुर्ती ,फोटो , कंठी माळा , धार्मिक पुस्तके किचेन ‘ विविध लहान मुलांची खेळणी आदि वस्तुंची दुकाने साहित्याने सजली होती नगरपालिका निवडणुक शासकीय कामाज दिवस सुट्टी नसल्याने भाविकांची संख्या यंदा सिमित होती . व्यापार व्यवसाय उलाढाल मध्यम स्वरूपाचा झाला अशी प्रतिक्रिया व्यापारी चन्ना स्वामी , रमेश वाले, चंद्रकांत माने , राजेश वाले ‘ यांनी दिली .

Post Views: 76
Previous Post

डोंगराळे प्रकरणी अति जलद गतीने खटला चालवावा

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलबुरगि – मुंबई विशेष रेल्वे धावणार  

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापरिनिर्वाण दिनानिमित्त कलबुरगि – मुंबई विशेष रेल्वे धावणार  

ताज्या बातम्या

तातडीने आदेश काढून करणार मदत मुख्यमंत्री फडणवीस #viral #solapurnews

September 23, 2026

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आजअभूतपूर्व गोंधळ#viral#solapurnews

September 23, 2026

दरोडयाच्या प्लॅनिंग मध्ये असतानाच पोलिसांनी घेतले ताब्यात

September 23, 2026

सोलापूरच्या सुशील महादेव यांनी तयार केला मांजर चित्रपट…

September 23, 2026
ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

September 23, 2026

माता रमाईच्या पुतळ्यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून तीन लाख तर पी.बी. ग्रुपकडून पाच लाख

September 23, 2026

अकलूज परिसरात दमदार पावसाच्या आगमन

September 23, 2026

शहरातील तहसिल कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक कोंडी पोलीसांनी हटविली

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1248516

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!