सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सोमपा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहरस्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या 3 विद्यार्थिनींनी यश प्राप्त केले
यामध्ये 14 वर्षाखालील गटात श्रद्धा धोत्रे द्वितीय, 17 वर्षाखालील गटात समीक्षा उकरंडे चौथा व प्रांजल कलशेट्टी सहावा क्रमांक प्राप्त केला आहे या तिघांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली
या यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक गुरुसिद्ध होर्तीकर प्रचिता जोगदांडे यांचे मार्गदर्शन लाभले
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय शिक्षण समितीचे चेअरमन सन्माननीय धर्मराज काडादी साहेब प्रशालाचे पालक सदस्य प्रभुराज मैंदर्गीकर सर्व शालेय शिक्षण समितीचे सदस्य मुख्याध्यापिका संगीता गोटे पर्यवेक्षिका सुनीता वाले यांनी अभिनंदन केले


























