Wednesday, November 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुमार व मुली गटातून सोलापूर, सांगली व धाराशिव उपांत्य फेरीत

तरुण भारतbyतरुण भारत
December 7, 2025
in sports
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अहिल्यानगर – महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यांचा थरार शिगेला पोहोचला आहे. कुमार गटात धाराशिव, पुणे, सांगली व सोलापूर संघानी तर मुलींच्या गटात धाराशिव, ठाणे, सोलापूर आणि सांगली या संघानी उपांत्य फेरी गाठत आपले वर्चस्व सिद्ध केले. सर्व सामने उच्च दर्जाची झुंज, रणनीती व जिद्दीचा उत्तम मिलाफ घडवणारे ठरले. येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत वेग, चातुर्य आणि मनोबळाची खरी परिक्षा पाहायला मिळाली.

उपउपांत्य फेरीच्या मुलांच्या पहिल्या सामन्यात धाराशिवने मुंबईवर १ डाव ३३ गुणांनी दणदणीत विजय मिळविला. मध्यंतरासच धाराशिवकडे ५ ड्रिम रनसह ४२-६ अशी मोठी आघाडी होती. धाराशिवकडून जितेंद्र वसावे (३.४० मि. संरक्षण व ६ गुण), विशाल वसावे (३.०० मि. संरक्षण व ४ गुण) राज जाधव (२.२० मि. संरक्षण व तब्बल १६ गुण) यांनी तर पराभूत मुंबईच्या प्रसाद घाडीगांवकर (४ गुण) सामन्यात एकार्फी कामगिरीची नोंद केली. 

दुसऱ्या सामन्यात सोलापूरच्या धारदार आक्रमणामुळे ठाण्याचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. सोलापूरने ४ गुणांनी निसटता विजय मिळविला. सोलापूरकडून शंभुराजे चंदनशिवने १.४० मि. संरक्षण करून आक्रमणात १० गुण मिळवले. सुहान आत्तारने २.१० मि; सिद्धार्थ मानेने १.५० मि. तर अकबर शेखने २.३० मि. संरक्षण केले. ठाण्याच्या आशिष गौतमने दोन्ही डावात प्रत्येकी २ मि. संरक्षण करून आक्रमणात ८ गुण संपादन करून एक हाती लढत दिली. ओंकार सावंतने १ , १.१० मि. संरक्षण करून आक्रमणात ६ गुण मिळवले.

तिसऱ्या सामन्यात  मध्यंतरातच २५-१२ अशी आघाडी घेणाऱ्या पुणे संघाने मुंबई उपनगर संघावर २६-२४ असा १ डाव २ गुणांनी मात केली. पुणे संघाकडून शंकर यादव १.४० व १.३० मि. संरक्षण आक्रमणात ८ गुण, श्री वसावेने १.२० व १.४० मि. संरक्षण केले. आदेश पाटीलने १.३० व १.५० मि. संरक्षण करताना आक्रमणात ४ गुण मिळवले. उपनगर संघाकडून अर्जुन सर्जेरावने १.०० मि. संरक्षण करीत आक्रमणात ४ गुण मिळवले.

चौथ्या सामन्यात सांगलीने  सातारा संघाला ५०-२४ असे २६ गुणांनी पराभूत केले. विजयी संघाकडून अथर्व पाटीलने १.३० मि. पळतीचा खेळ करत ६ गुण मिळवले. गणेश परेकरने १.४०, २ मि. पळतीचा खेळ करत ६ गुण मिळवले. पार्थ देवकातेने १.३०, १.२० मि. पळतीचा खेळ करत १० गुण मिळवले. तसेच सातारा संघाकडून प्रेम लोखंडेने २ मि. खेळ करत २ गुण तर लोकेश जाधवने १.४० मि खेळ करत २ गुण आणि तबरेज खानने १.४० मि. खेळ करत ८ गुण मिळवले.

———

मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात सोलापूरने साताऱ्यावर २९-२२ असा ५.२० मि.  राखून ७ गुणांनी विजय मिळविला. सोलापूरकडून खेळताना स्नेहा लामकाने ५.१० व १२ गुण, अश्विनी मांडवेने १.३५ मि. संरक्षण व ४ गुण तसेच कल्याणी लामकाने हिने १.५०, १.४५ मि. संरक्षण व २ गुण मिळवले. साताऱ्या कडून संचिता गायकवाडने  १.३०, १.४० मि. संरक्षण व ८ गुण मिळवले. 

धाराशिव विरुद्ध रत्नागिरी या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात धाराशिव संघाने ३२-२७ असा ५ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिली पवारने ३.५०, ३.४९ मि. संरक्षण करत आक्रमणात १६ गुण मिळवले. सिद्धी भोसलेने १.१० मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. राही पाटीलने १.४० मि. २.२० मि. संरक्षण करून दोन गुण संपादन केले. रत्नागिरीतर्फे सायली कर्लेकरने १.४०, १.२० मि. संरक्षण  करत २ गुण, साक्षी लिंगायत १.४० संरक्षण करत २ गुण, श्रावणी सनगरेने १.१० मि., दिव्या सनगले १ मि. खेळ केला. आक्रमणात वैष्णवी फुटकने १० गुण, दिव्या पाल्येने ८ गुण तर तन्वी खानविलकरने ४ गुण मिळवले.

ठाणे विरुद्ध नाशिक या तिसऱ्या सामन्यात  ठाणे संघाने १३ गुण आणि ४.३० मिनिटं राखून विजय मिळविला. ठाणे संघाकडून धनश्री कंकने ३.१० मिनिटे संरक्षण केले. श्रुती चोरमारेने २.५५ मि. संरक्षण करत आक्रमणात ४ गुण मिळवले. दीक्षा काटेकरने १.३० मि. संरक्षण करून सहा गुणांची कमाई केली. प्रणिती जगदाळेने २.१०, नाबाद २.३० मि. संरक्षण करून आक्रमणात दोन गुण मिळवले. नाशिक संघाकडून नीलम महाडकरने २.३०, १.१५ मि.  संरक्षण करून आक्रमणात दोन गुण मिळवले.

चौथ्या सामन्यात सांगलीने पुण्याला १५-२९ असे १४ गुणांनी नमविले. सांगली कडून  श्रावणी तामखडे हिने ३.३० मि. संरक्षण केले. धनश्री तामाखडेने २.५० मि. संरक्षण व आक्रमणात ४ गुण, चाफे सानिका २.५० मि. संरक्षण व आक्रमणात २ गुण तर कृत्तिका अहिरने ३.४० मि. संरक्षण व आक्रमणात २ गुण मिळवले. पुण्याकडून अपर्णा वर्धेने २.२० मि. संरक्षण, धनश्री लव्हाळने १.५० मि.संरक्षण व ४ गुण मिळवले.

———

असे होणार उपांत्य सामने

कुमार गट : धाराशिव विरुद्ध पुणे,  सोलापूर विरुद्ध सांगली.

मुली गट : धाराशिव विरुद्ध ठाणे, सोलापूर विरुद्ध सांगली.

——-

Views: 124
Previous Post

प्रहारतर्फे रितू नलवडेंचा सत्कार

Next Post

कांदा बाजारपेठ बंद ! माथाडी कामगार संघटनेचे अनुयायी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमीला दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कांदा बाजारपेठ बंद ! माथाडी कामगार संघटनेचे अनुयायी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चैत्यभूमीला दाखल

ताज्या बातम्या

हुतात्मा स्मृती मंदिर विकास सहकारी बँक सोलापूर देगलूरकर महाराज

November 24, 2026

श्री सिद्धेश्वर मंदिर दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा!

November 24, 2026

हजारो दिव्यांनी उजळले श्रीराम मंदिर; दीपोत्सवाचा भक्तिमय सोहळा!

November 24, 2026
गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता 

गोपाळपुर काल्याने कार्तिकी यात्रेची सांगता 

November 24, 2026
आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही – मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील 

आयुष्यात कितीही संकटं आली तरी स्वामींवर ठेवलेली श्रद्धा कधीच ढळू देत नाही – मा.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील 

November 24, 2026
त्रिपुरारी पौर्णिमा १ लाख भाविकांनी घेतले दर्शन

त्रिपुरारी पौर्णिमा १ लाख भाविकांनी घेतले दर्शन

November 24, 2026
भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा संपन्न

भगवान श्री १००८ मुनिसुव्रतनाथ यांच्या ३१ फुटी भव्य प्रतिमेचा शिलान्यास व भूमिपूजन सोहळा संपन्न

November 24, 2026

महामार्ग सुरक्षेत मोडनिंब पोलिसांचा ठसा; वाहतूक शिस्त सुरक्षित प्रवासाची दक्षता 

November 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1560419

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!