जालना – येथील ऋषि विद्यालयात कौशल बहुउद्देशीय संस्थेतर्फे आयोजित ओपन स्केटिंग चॅम्पियन स्पर्धेत 12 वर्षांखालील वयोगटात ऋषि विद्यालय एज्युकेशनल स्कूलचा विद्यार्थी निकुंज विष्णु खंडेलवाल याने प्रथम क्रमांक पटकवून सुवर्ण पदक मिळवले.
निकुंजच्या या उत्कृष्ट यशाबद्दल ऋषि विद्यालय एज्युकेशनल स्कूलच्या प्राचार्या डॉ. हेमा सोनटक्के तसेच आयोजकांनी त्याचे अभिनंदन केले.

















