करमाळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरपडोहच्या खो-खो संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून शाळेचा आणि गावाचा मान उंचावला आहे. या अभूतपूर्व यशानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने सर्व खेळाडू व मुख्याध्यापक श्री श्रीकृष्ण अडसुळ श्री लोकरे सर श्रीम. बडे मॅडम श्रीम वणवे मॅडम श्रीम कुलकर्णी मॅडम मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक आल्या बद्दल कु साक्षी खराडे हीचा सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून उपसरपंच श्री. नाथाराव रंदवे सर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष — श्री. बाळासाहेब महाडीक, प्रगतीशील बागायतदार — श्री. शरद घोगरे, माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य -श्री. मनोहर रंदवे, तंटा मुक्त समिती अध्यक्ष – श्री नागनाथ भिताडे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. लोकरे सर यांनी देखणेपणे केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती बडे मॅडम यांनी केले.
खेळाडू, प्रशिक्षक शिक्षक व शाळेचे मनःपूर्वक अभिनंदन! जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा




















