बार्शी – तालुक्यातील उपळाई ठोंगे येथे संत निरंकारी मंडळ शाखा बार्शीच्यावतीने परम आ. इंद्रपालसिंह नागपालजी झोनल प्रमुख सोलापूर यांच्या उपस्थितीमध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये ६१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. श्रीकांत शिंदे (ग्रामीण रुग्णालय बार्शी) यांनी रक्तदानाबद्दल सर्वांना जागृत केले आणि माहिती दिली. राजेंद्र चव्हाण यांनीही मिशनचा परिचय व महिती दिली, सरपंच मधुकरआप्पा वैद्य, माजी उपसरपंच संदीप बोटे, बार्शी मुखी शशिकांत शिंदे, माढा मुखी समाधान राऊत, राजेंद्र चव्हाण, कैलास पाटोळे (प्रचारक बीड), सबक चंदजी (सोलापूर), श्याम पाटील यांची उपस्थिती लाभली , नागपाल आपल्या विचारातून म्हणाले की, संत निरंकारी मंडळ सोलापूर झोनमध्ये प्रत्येक वर्षी ३,००० पेक्षा जास्त ब्लड डोनेट केले जाते.
तसेच संत निरंकारी मंडळ रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, स्वच्छता अभियान, जलस्वच्छता अभियान अशी अनेक उपक्रम राबवत आहोत. रक्तदान शिबिराबद्दल उपयुक्त अशी माहिती सर्वांना सांगितली व किशोर ढोले (सेवादल संचालक बार्शी), ऋषिकेश शेळके (सेवादल शिक्षक), संगीता भोसले (सेवादल महिला इन्चार्ज), अशोक पाटील उपळाई मुखी, सेवादल व साधसंघत यांचे सहकार्य लाभले. रक्त संकलन रामभाई शहा ब्लड बँक बार्शी यांनी केले.
सुत्रसंचलन विक्रम क्षीरसागर यांनी केले.
















