Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हसनाळ व रावणगाव पूरग्रस्तांसाठी दिलासा : जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तरुण भारतbyतरुण भारत
December 9, 2025
in marathwada
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिलोली / नांदेड – ऑगस्ट महिन्यात झालेल्या ढगफुटीमुळे हसनाळ व रावणगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित-वित्तहानी झाली. अनेकांचे संसार उघड्यावर पडले असून अजूनही काही कुटुंबे तात्पुरत्या आश्रयावर विसंबून आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर शासन, प्रशासन, व्यक्ती, सामाजिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राने पुढाकार घेऊन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तत्परता दाखवली आहे. सगरोळी (ता. बिलोली) येथील संस्थेनेही विविध घटकांच्या सहकार्याने मदतकार्य सुरू केले आहे.

पूरग्रस्तांच्या तातडीच्या गरजांचा विचार करून अधिक प्रभावी मदत कार्यक्रम आखण्यासाठी शुक्रवार (दि.५) रोजी सगरोळी येथे संस्कृति संवर्धन मंडळाच्या संकुलात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये घरकुल पुनर्बांधणी आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.

पूरामुळे अनेक घरे पूर्णपणे कोसळली असून काही घरे राहण्यायोग्य राहिली नाहीत. त्यामुळे ज्यांची घरे अद्याप उभी राहू शकलेली नाहीत अशा कुटुंबांना सर्वांच्या सहकार्याने घर उपलब्ध करून देण्यासाठी बैठकीत एकमत झाले. यासाठी अशा कुटुंबांची सर्वंकष माहिती तातडीने संकलित करून जलद मदत उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.

जिल्हाधिकारी म्हणाले की, घरकुलांचे बांधकाम कमीत कमी खर्चात आणि शक्य त्या अल्पावधीत पूर्ण व्हावे, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत आणि समन्वय दिला जाईल. मागणी केलेल्या कुटुंबांची अ, ब, क अशा गटांमध्ये प्राधान्यक्रमानुसार वर्गवारी करण्यात येणार असून एकल महिला आणि भूमिहीन कुटुंबांना सर्वोच्च प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही संपूर्ण मोहीम जिल्हा प्रशासन, संस्कृति संवर्धन मंडळ आणि मशाल संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. कामाची शास्रीय आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी एक समन्वय समिती गठित केली जाणार असून प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला ऑनलाइन बैठक आयोजित केली जाईल.

बैठकीच्या सुरुवातीला ‘मशाल’ संस्थेचे कार्यकारी संचालक निलेश करकरे यांनी हसनाळ व रावणगाव येथील क्षेत्र भेटीच्या आधारे पूरस्थितीचे विश्लेषण, नुकसानीचे स्वरूप आणि पुढील शक्यता यावर सविस्तर सादरीकरण केले. या बैठकीस संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख, जलतज्ञ डॉ. सुमंत पांडे, उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, उपजिल्हाधिकारी क्रांती डोंबे, मशाल संस्थेचे कार्यक्रम व्यवस्थापक गणेश शिंदे, संस्था कार्यकर्ते अभिजीत महाजन, वसंत रावणगांवकर, व्यंकट शिंदे तसेच हसनाळ व रावणगाव येथील राजू पाटील रावणगावकर, प्रदीप पाटील, शादुल पटेल, आनंदराव पाटील, शंकर पाटील, प्रल्हाद मादळे, पप्पू आप्पा हासनाळे, मशरू पटेल आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ: पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मा.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सगरोळी (ता.बिलोली) येथे बैठक झाली.

Post Views: 25
Previous Post

दहा वर्षांच्या रुद्रची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये दमदार कामगिरी

Next Post

विजयकुमार बेंबडे यांना श्यामची आई तर रानकवी श्रीनिवास मस्के यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्कार जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विजयकुमार बेंबडे यांना श्यामची आई तर रानकवी श्रीनिवास मस्के यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

प्राचार्यांकडून झालेला अपमान जिव्हारी 19 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या. #college #foryou #vairal

February 17, 2026

पंढरपूर नगरपालिकेचा नवा उपक्रम…#pandhrpur

February 17, 2026

दोन दिवसाआड पाणीपुरवठा अशक्य..#solapurnews #solapur #पाणी

February 17, 2026

सोने चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच.#gold #jewellery

February 17, 2026

संगमनेर मध्ये 14 कत्तलखाने जमीन उध्वस्त.#public #marathinews

February 17, 2026

२३ वर्षीय तरुणाने प्रेम संबंधातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.#public

February 17, 2026

महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

February 17, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ट्रेनिंग प्रोग्रॅम 

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684273

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697