सोलापूर – जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असोसिएशनच्या सन २०२५-२६ ते २०२७-२८ या उर्वरित सालासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड अध्यासी अधिकारी मा.श्री. उमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. अध्यक्षपदी डॉ.श्री अशोक सुरवसे व उपाध्यक्षपदी श्री. दिपक मुनोत यांची एकमताने निवड करण्यात आली. डॉ अशोक सुरवसे यांचे नांव श्री. किसन माळी (सी.ए.), यांनी सुचविले व अनुमोदन श्री कल्याणराव काळे यांनी दिले.
उपाध्यक्ष श्री दिपक मुनोत यांचे नाव श्री. राजगोपाल मिणियार (सी.ए.), यांनी सुचविले व श्री. राजगोपाल झंवर यांनी अनुमोदन दिले. अध्यासी अधिकारी मा.श्री.उमेश पवार यांचा सत्कार श्री. प्रकाश वाले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नूतन अध्यक्ष डॉ.श्री अशोक सुरवसे व उपाध्यक्ष श्री दिपक मुनोत यांचा सत्कार अध्यासी अधिकारी मा.श्री. उमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
नूतन अध्यक्ष डॉ.श्री. अशोक सुरवसे यांनी बँक्स् असोसिएशनच्या संचालकांचे आभार मानून, बॅक्स् असोसिएशनच्या प्रगतीकामी सहकार्य करण्याचे आवाहन केले. सोलापूर जिल्हयातील नागरी सहकारी बँकेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहिन असे प्रतिपादन केले. नूतन उपाध्यक्ष श्री. दिपक मुनोत यांनी सभासद बँकांसाठी जास्तीत जास्त काम करु असे मनोगत व्यक्त केले सीए श्री. राजगोपाल मिणियार यांनी तत्कालीन अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी मागील वर्षभरात कामकाज चांगले केल्याबद्दल असोसिएशच्या वतीने अभिनंदन केले व आभार मानले.
सभेस अध्यासी अधिकारी मा.श्री. उमेश पवार व संचालक मंडळ श्री. राजगोपाल झंवर, श्री. राजगोपाल मिणीयार (सी.ए.), श्री. किसन माळी (सी.ए.), श्री. कल्याणराव काळे श्री. अशोक लुणावत, श्री. शंकर पाटील, श्री. दिपक मुनोत, श्री. दिनकर देशमुख, संचालिका सौ. संगीता फाटे, सौ. अस्मिता गायकवाड व साईओ सौ. शुभांगी ढवळे उपस्थित होते.



















