कुर्डूवाडी – शेतकऱ्यांचा हमीभावाने माल खरेदी करताना ऑनलाईन नोंदी करण्याची अट शिथिल करावी अशी मागणी माढा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष तुकाराम ढवळे यांनी खरेदी विक्री संघाकडून उडीद, सोयाबीन,मुग या पिकाचे हमीभाव केंद्र उद्घाटन प्रसंगी केले.
ग्रामीण भागातील शेतकरी अनेक वेळा स्वतःच्या मुलाच्या जन्माचे नाव सुद्धा लावायचे विसरून जातो.मात्र त्याच शेतकऱ्याला शासनाने हमीभाव मध्ये शेतीमाल खरेदी करताना ऑनलाईन नोंदीची अट घातली आहे. शेतकरी वर्गा साठी हि अट जाचक ठरत आहे.त्यामुळे अनेक शेतकरी या योजने पासून वंचित राहतात .सरकार ने याचा गांभीर्याने विचार करावा असे त्यांनी सांगितले.
कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाने नेहमी मिळून काम केले आहे. शेतकरी माल खरेदी करताना रब्बी व खरीप असे दोन भाग केले आहेत .त्यामुळे शेतकरी माल खरेदी करताना त्याच हंगामात नोंद असावी लागते त्यामुळे नोंदी असून हि अनेक वेळा माल खरेदी करता येत नाही असे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सुहास पाटील जामगावकर यांनी सांगितले.
यावेळी शिवाजी पाटील,नागेश खटके,किसन पाटील ,अमोल देवकर,नागनाथ पाटील,पोपटलाल दोबाडा,सतीश सुर्वे,अजिनाथ बोंगाळे,शहाजी कदम,नागनाथ माळी,सुधीर चोपडे आदि संचालक अधिकारी यावेळी उपस्थित होते.


















