सोलापूर – मानवतेचे उपासक संत बुरुड केतया यांच्या मूर्तीची पार्क चौकात बुरुड समाज युवक संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सुपेकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते दहा डिसेंबर या जयंतीनिमित्त प्रतिष्ठापना करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील समाज बांधवांना संत केतया यांच्या साडेतीन फूट पूर्णाआकृती मूर्तीचे वाटप करण्यात आले.
यावेळी बुरुड समाजाचे शहराध्यक्ष सूर्यकांत शेंद्रे , विठ्ठल साळुंखे ,ज्ञानदेव सुपेकर , नवनाथ सुरवसे शिवाजी जतकर संदीप सुरवसे, सचिन वडतीले, विजय जतकर , विष्णू साळुंखे ,कृष्णकुमार कुकडे, सोनबा जतकर, गोपी जतकर, श्रेष्ठ पत्रकार दशरथ वडतीले, राजू साळुंखे, प्रशांत रोहिटें, युवराज सुरवसे, अधि कार्यकर्ते उपस्थित होते.
सायंकाळची महापूजा समाजातील जेष्ठ महिला भगिनींच्या हस्ते करण्यात आली यावेळी लक्ष्मी साळुंखे, अंजना सुरवसे, वैशाली जतकर, वैशाली सुरवसे, माधुरी सुरवसे,संगीता वडतीले , शिलार रोहिटे, रूपाली शेंद्रे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

















