सोलापूर – श्री मल्लिकार्जुन हायस्कूल,हत्तुरे नगर, सोलापूर येथे भारतीय डाक विभाग, शिवशाही यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना पोस्टातील विविध योजने विषयी माहिती देण्यात आली.
यावेळी पोस्टमास्तर रमाकांत जाधव यांनी पोस्टाचा इतिहास सांगत कामकाज कसे चालते,पोस्टातील POSB,SSA,PPF अकाउंट व जीवन विमा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच पैशाची बचत करावी,बँकेतील व्यवहार याविषयी माहिती दिली.
यावेळी पोस्ट मास्तर रमाकांत जाधव, अक्षय कुलकर्णी, वैभव कोळी, सचिन टिके,प्रणाली जाधव ,ऐश्वर्या गावडे या पोस्ट कर्मचाऱ्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मार्गदर्शक धरेप्पा हत्तुरे,प्रभारी मुख्याध्यापक रमेश दिंडोरे,भारत राऊत,अण्णाराया तुप्पद,अनिलकुमार गावडे व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश आगावणे यांनी केले,तर सर्व उपस्थितांचे आभार अनिता हौदे यांनी मानले.

















