नायगांव / नांदेड – नरसी येथील श्री संगमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अपंग निवासी विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.३ डिसेंबर रोजी सकाळी प्रार्थनेनंतर झालेल्या कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिका सौ. आनुसया हिमगीरे यांच्या हस्ते डॉ. हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर शिक्षक व कर्मचार्यांनीही सामूहिकरित्या अभिवादन करत दिव्यांग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढावा आणि सामाजिक जागरूकता निर्माण व्हावी यासाठी घोषवाक्यांचे फलक हातात धरून विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान उपस्थितांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला व गुणांना संधी मिळावी या उद्देशाने रांगोळी व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवे चैतन्य व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी पी.जी. तमशेट्टे, सौ. पी.एम. वाघमारे, सौ. एस.जी. तमशेट्टे, एम.आर. बागवान, एस.जी. भालके, सौ. ए.एल. गवलवाड तसेच शिक्षकवृंद हि.एन. शिंदे, एस.एम. कुहाडे, ए.आर. बेग, एन.एस. मांजरमकर यांचे विशेष सहकार्य लाभले.


















