नायगाव / नांदेड – गडगा केंद्रांतर्गत मोकासदरा येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शालेय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांनी सुचवलेल्या शैक्षणिक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शिक्षकांच्या अध्यापन गुणवत्तावृद्धीसाठी ही परिषद विशेष उपयुक्त ठरली.
गटशिक्षणाधिकारी सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शना खाली केंद्रप्रमुख कपिल गारटे यांच्या नेतृत्वाखाली १० डिसेंबर रोजी आयोजित या एकदिवसीय शालेय शिक्षण परिषदेची सुरुवात शिक्षक गणेश वाले नीं सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने झाली.
अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख गारटे होते. त्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले
परिषदेतील मार्गदर्शन सत्रात सुलभक गजानन नागेश्वर व रवि प्रकाश बुध्देवार यांनी सकारात्मक शिस्त, बालसुरक्षा, माता-पालक गट बळकटीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. तसेच डॉ. जयंत नारळीकर गणित व विज्ञान समृद्धी कार्यक्रम याबाबत माहिती देत विद्यार्थ्यांच्या संकल्पनावृद्धीसाठी नव्या अध्यापन पद्धतींचा उपयोग करण्यावर भर देण्यात आला.
केंद्रप्रमुख कपिल गारटे यांनी इयत्ता ४ थी, ७ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पूर्वतयारी, तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरू असले ल्या विविध शैक्षणिक योजना व बालसंगोपन योजना यांची माहिती देत शिक्षकांनी संघटितपणे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
या परिषदेच्या यशस्वीतेसाठी आनंद गायकवाड (मु.अ., संकुल गडगा), आनंदराव आमलापुरे (पदोन्नत मु.अ.), सूर्यकांत जाधव (माजी पर्यवेक्षक), आनंदराव सूर्यवंशी, एकनाथ मुनगीलवार (माजी मुख्याध्यापक), नागनाथ येल्लूरे व नागोराव चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
समृद्ध विषयांची मांडणी, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शैक्षणिक प्रगतीसाठीची दृढ भूमिका यामुळे ही परिषद गडगा केंद्रातील शैक्षणिक उपक्रमांना नवी दिशा देणारी ठरली.
















