धाराशिव – कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे जागतिक एड्स निर्मूलन सप्ताहाचे औचित्य साधून ग्रामीण रुग्णालय वाशी व कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने एड्स जनजागरण रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.शामसुंदर डोके, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दयानंद कवडे,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ अनंत पाटील,प्रा.डॉ दैवशाला रसाळ,प्रा.डॉ नेताजी देसाई,प्रा.मिलिंद शिंदे,प्रा.अजितकुमार तिकटे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री.संतोष बुधोडकर,एड्स समुपदेशक श्री.परमेश्वर तुंदारे व आरोग्य कर्मचारी श्री.बाबासाहेब नितळ उपस्थित होते.
सर्वप्रथम रेड रिबन क्लब चे सदस्य श्री.सोहेल शेख यांनी एड्स आजाराविषयी तसेच एड्स होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी या विषयी आपले मत व्यक्त केले. या नंतर प्रभारी प्राचार्य प्रा.शामसुंदर डोके यांनी एड्स जनजागरणाचे महत्व सांगितले.
महाविद्यालयाच्या परिसरामधून प्रभारी प्राचार्य प्रा.शामसुंदर डोके यांनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी यांनी हिरवा झेंडा दाखून रॅली ला सुरवात करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयामध्ये समुपदेशक श्री.परमेश्वर तुंदारे यांनी एड्स रोगाची लक्षणे तसेच शासकीय रुग्णालयातून केले जाणारे मोफत उपचार तसेच रोगाच्या निर्मूलनासाठी जनजागरणाचे महत्व या विषयी सविस्तर माहिती दिली यावेळी प्रा.महादेव उंदरे यांनी उपस्थितांना शपथ दिली. उपस्थितांचे आभार प्रा.डॉ दैवशाला रसाळ यांनी मानले.
















