हिंगोली – शिरड शहापुर (ता. औंढा नाग.) येथील लक्षवेध कोचिंग क्लासेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लक्षवेध कोचिंग क्लासेसचे प्रमुख सुकेश कांबळे सरसमता दूत कार्यक्षेत्र औंढा नाग.यांनी भूषवले. त्यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या समर्पित सामाजिक जीवनावर प्रकाश टाकत, त्यांच्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी अनिल कांबळे, जिल्हाध्यक्ष – वंचित बहुजन आघाडी, हिंगोली यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भैय्यासाहेब आंबेडकर यांचे संविधाननिष्ठ, समतावादी विचार आणि बौद्ध चळवळीतील योगदान यावर सविस्तर विचार मांडले.
कार्यक्रमास अनिल कांबळे,सुकेश कांबळे सर, हनीफ पठाण, स. मोसिन, असिफ रजा, गुडू शेठसुमेर शेख, तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सांगता जयभीम घोषणांनी करण्यात आली.


















