सोलापूर : सोरेगावातील प्राचीन महादेव मंदिराचा कळसारोहण सोहळा शुक्रवारी भक्तिमय वातावरणात करण्यात आला. या कार्यक्रमास काशीपीठाचे जगदगुरु श्री श्री श्री १००८ जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्रोच्चार, शंखनाद आणि ढोल-ताशांचा गजर यांमुळे भाविकांत उत्साह संचारला होता.
सोरेगाव ग्रामस्थांच्या एकजुटीने आणि श्रद्धेने उभे राहिलेले प्राचीनकालीन महादेव मंदिराचा सामाजिक कार्यकर्ते अक्षय वाकसे यांनी जीर्णोद्धार केला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन निशाणदार व वाकसे परिवार, तसेच सोरेगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
प्रारंभी काशीपीठाचे जगदगुरु श्री श्री श्री १००८ जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या व श्रो. ब्र. श्री. डॉ. पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी नागणसुर, श्रो. ब्र. श्री. डॉ. पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी माळकवठा, श्री वेदमूर्ती कल्याण शास्त्री गणेचारी, वेदमूर्ती विरभद्रय्या स्वामी सोरेगाव यांच्या हस्ते कळसारोहण, महाशांती आणि अभिषेक विधी संपन्न झाले.
काशीपीठाचे जगदगुरु श्री श्री श्री १००८ जगदगुरु डॉ. मल्लिकार्जुन शिवाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी भाविकांना आशीर्वचन दिले. नवनिर्मित शिखरावर सुवर्ण कलशाची स्थापना होताच भाविकांनी ‘नमः पार्वती पतये हर हर महादेव’ चा उत्स्फूर्त गजर केला. या आध्यात्मिक सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. कलशारोहण कार्यक्रमानंतर भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आणि व्यवस्थापनाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे कौतुक केले.
या वेळी आयोजक अक्षय वाकसे, माजी आमदार दिलीप माने, डॉ. शिवरत्न शेटे, नम्रताताई कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, सुयश खानापुरे, संतोष वाकसे, श्रीकांत निशानदार, राजशेखर पाटील, संजय वाकसे, शिवानंद कोरे, सिद्धराम भीमदे, विजू स्वामी, अनिल खडखडे, संदीप म्हेत्रे, चंदू खडखडे, वामन कांबळे, नागनाथ भरले, धनू कांबळे, बबलू कांबळे, राहुल कुटेकर, अमर डूरके आदी वर्ग उपस्थित होते.





















