माळशिरस – जवाहर नवोदय प्रवेश परिक्षासाठी माळशिरस तालुक्यातील माळशिरस नातेपुते अकलूज या तीन केंद्रातीन५वी च्या १ हजार७३ विदयार्थ्यांनी परिक्षा दिली असल्याची माहिती माळशिरस केंद्रातील केंद्र निरीक्षक निलेश आदमाने यांनी दिली,या वेळी गोपाळराव देव प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय केसकर, केंद्र संचालक सुर्यकांत जानकर उपस्थित होते .
नवोदय २०२६ च्या प्रवेशासाठी आज तालुक्यातील माळशिरस केंद्रातून ३५३, नातेपुते३६० , अकलूज केंद्रातून ३६० , विद्यार्थांनी परिक्षा दिली , सदरची परिक्षा एबीसीडी कोड मधून घेण्यात आली. या परिक्षेसाठी सकाळ साडे नऊ पासुनच पालक विद्यार्थी शिक्षकांनी गर्दी केली होती परिक्षा केंद्रामध्ये व बाहेर विद्यार्थी परिक्षेच्या बैठकीची माहिती फलकावर लावण्यात
आली होती. त्यावेळी विद्यार्थी व पालकांना सुलभ झाले .कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये म्हणून पोहॅकॉ एम पी थोरात व त्यांचे हजर होते. तसेच विदयार्थासाठी आरोग्य पथक उपस्थित होते.

























