Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनपा निवडणुकीसाठी उत्तरा बरडे यांच्या नावाची घोषणा, मोठी बैठक…  पक्षाचा निर्णय मात्र गुलदस्त्यात

तरुण भारतbyतरुण भारत
December 17, 2025
in political
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ७ मधून शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांची कन्या उत्तरा बरडे – बचुटे यांच्या नावाची घोषणा मंगळवारी झालेल्या बरडे समर्थकांच्या बैठकीत करण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हांडे प्लॉट येथे झालेल्या या बैठकीप्रसंगी केलेल्या भाषणात पुरुषोत्तम बरडे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले.

या बैठकीत प्रसंगी प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे, उत्तरा बरडे – बचुटे, स्वाती रुपनर, वैशाली सातपुते, अर्चना बरडे, लहू गायकवाड, बबलू चौगुले, रणजीत काशीद, दिनकर जगदाळे, सुरेश जगताप, महादेव सलगर, आशुतोष बरडे उपस्थित होते.

पुरुषोत्तम बरडे म्हणाले, गेल्या ३८ वर्षांपासून शिवसेनेच्या विस्तारासाठी विकासासाठी मी अहोरात्र काम केले आहे. अनेक निवडणुकांमध्ये आपला निसटता पराभव झाला आहे. प्रभाग क्रमांक ७ मधून यंदा मात्र विजय आपलाच आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये विकासाची कामे करण्यासाठी तरुणांना रोजगार देण्यासाठी तसेच व्यसनमुक्त तरुण घडविण्यासाठी उत्तरा बरडे – बचुटे यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे, असे आश्वासनही पुरुषोत्तम बरडे यांनी याप्रसंगी दिले. आजवर अनेक निवडणूकीत ‘गड आला पण सिंह गेला’ अशी अवस्था झाली. परंतु यंदा गडही येणार आणि सिंहींण देखील येणार, असेही पुरुषोत्तम बरडे याप्रसंगी म्हणाले.

यावेळी उत्तरा बरडे – बचुटे, सुरेश जगताप, स्वाती रूपनर, राजकुमार माने, अतुल कणसे, आशुतोष बरडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या बैठकीस धनराज जानकर, बाळासाहेब माने, शिवाजीराव बचुटे, तानाजी खटके, ज्ञानेश्वर कांबळे, दादा डिगे, राहुल कालेकर, दत्तात्रय देशमुख, अण्णा गवळी, मीनाक्षी गवळी, सचिन सुरवसे, नागेश पडवळकर, योगेश खटके, योगेश क्षीरसागर,  सतीश पवार, अमर जाधव, शाबीर सय्यद, सलीम शेख, धनंजय माळवे, अमर खटके, कैलास व्हनमाने, गणेश आदमाने, विष्णू जवंजाळ, संदीप भोसले, मारुती खानापूरे, अन्वर मिरजकर, शिवाजी शेवतेकर, अतुल कणसे, अमित डोके, राजाभाऊ कोळेकर, गजाभाऊ पटाडे, सिद्राम मुडे, अस्लम शेख यांसह प्रभाग ०७ मधील विविध भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन रूपनर यांनी तर आभार समर्थ बरडे यांनी मानले.

राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ

राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे. या खेळात काही चाली राखीव ठेवाव्या लागतात. माझ्यावर विश्वास ठेवा. उमेदवार आणि नगरसेवक आपला असेल. १६ जानेवारी रोजी फटाके जुना पुणे नाका येथील पावन गणपतीसमोरच फुटतील असे सांगत बरडे यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे.

Post Views: 76
Previous Post

उत्कृष्ट स्काऊट मास्टर म्हणून सोमेश्वर यंपे यांचा सन्मान

Next Post

पोलीस पाटील दिन विशेष : गावगाड्याचा कणा असलेला प्रशासनाचा दूत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

पोलीस पाटील दिन विशेष : गावगाड्याचा कणा असलेला प्रशासनाचा दूत

ताज्या बातम्या

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026
वडापूरच्या भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज कम पुलामध्ये रूपांतर करा

वडापूरच्या भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेज कम पुलामध्ये रूपांतर करा

July 26, 2026
स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हजरत मियासाहाब दर्गा परिसर येथे वृक्षारोपण

स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त हजरत मियासाहाब दर्गा परिसर येथे वृक्षारोपण

July 26, 2026

औशात २९ लाखांचा गुटखा पकडला, तेलंगणातील दोघेजण गजाआड 

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0999546

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!