अक्कलकोट – विबोधी महिला फाउंडेशन व सौ. शितल परब मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने आज जि.प.प्रा.मराठी शाळा, शिवाजीनगर तांडा,दुधनी येथे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास विबोधी महिला फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सौ.वर्षा यादव मॅडम प्रमुख उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या वतीने बालकलाकार विबोधी यादव व सौ.वर्षा यादव मॅडम यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पोमू राठोड यांनी सांगितले की,गेल्या अनेक वर्षांपासून विबोधी महिला फाउंडेशनच्या माध्यमातून या शाळेस विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य तसेच गणवेशांचे वाटप केले जात आहे.
गोरगरीब कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत,शाळेची गोडी लागावी आणि शिक्षण घेत असताना कोणत्याही आवश्यक गोष्टींची कमतरता भासू नये,या भावनेतून फाउंडेशन सातत्याने कार्यरत आहे.हे कार्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत प्रेरणादायी असून पुढील काळातही विविध स्वरूपात शाळेला मदत करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.
या कार्यक्रमास सौ.वर्षा यादव, बालकलाकार विबोधी यादव, श्री.पोमू राठोड,श्री.श्रशैल मलगण,श्री.सुरूपसिंग राऊत व सौ.पार्वती ढाकरे यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या शेवटी श्री.पोमू राठोड यांनी उपस्थित मान्यवरांचे व फाउंडेशनचे आभार मानले.

















