सोलापूर – देसाई नगर येथील हद्दवाढ भागातील रविकिरण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीनाथ हायस्कूल येथे वार्षिक क्रीडा सप्ताहस प्रारंभ झाला. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शट गार यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक डॉक्टर श्रीपाद सुरवसे उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक संतोष पवार यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष सातलिंग शट गार म्हणाले की मन मनगट मेंदू हे तंदुरुस्त असेल तर शरीर तंदुरुस्त असतो. त्यामुळे तंदुरुस्त शरीरात तंदुरुस्त मन वास करत असतो .त्यासाठी प्रत्येकाने कोणते तरी खेळ खेळलेच पाहिजे .व्यायामाने मन प्रसन्न राहतो. शरीर चांगले राहते .आणि आपला आयुष्य वाढतो. त्याचे अनेक फायदे आहेत. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाच्या वाढीसाठी खेळ हा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेतले पाहिजे. बक्षीस मिळो अथवा न मिळो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण उतरले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी खेळ शिक्षक श्री संतोष बिराजदार यांनी खेळाचे महत्व सांगून खेळास प्रारंभ केले कबड्डी. खो-खो. हॉलीबॉल. टेनिस .क्रिकेट. फुटबॉल. लंगडी, आधी खेळाचा यात समावेश असून आठवडाभर या खेळाचे नियोजन केल्याचे श्री बिराजदार यांनी सांगितले शनिवारी या खेळाचे समारोप होणार असून प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना श्री सातलिंग शटगार सर यांच्यामार्फत शील्ड देण्याचे त्यांनी जाहीर केले यावेळी स्मिता छोटे श्री गिरीशशिंदे सर. श्री विजापुरे.. श्री कोळी आधी सह विद्यार्थी उपस्थित होते शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शट गार सरांच्या तर्फे अल्प उपहार देण्यात आले.


















