Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

तरुण भारतbyतरुण भारत
June 10, 2026
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि शिस्तीला प्राधान्य देत विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी शासन निर्देशानुसार सर्व महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करणे बंधनकारक असल्याच्या सूचना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दिल्या आहेत. विद्यापीठाच्या प्रवेश समितीची बैठक कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील ऑनलाइन पोर्टलद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू असून प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शासनाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांची उपस्थिती अचूक व पारदर्शक पद्धतीने नोंदविण्यासाठी सर्व महाविद्यालयांनी तातडीने बायोमेट्रिक मशीन कार्यान्वित करून त्याचा नियमित वापर सुरू करावा, असे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची संपूर्ण नोंद व रेकॉर्ड महाविद्यालयांनी जतन करून ठेवावी. बायोमेट्रिक प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची अचूक माहिती उपलब्ध होणार असून शैक्षणिक प्रक्रियेत अधिक शिस्त निर्माण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी व्यापक नियोजन करण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार सर्व वर्गखोल्या तसेच प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह शैक्षणिक प्रक्रियेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी ही व्यवस्था उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कौशल्याधारित शिक्षणाला चालना देण्यासाठी एईडीपी (Apprenticeship Embedded Degree Programme) अंतर्गत महाविद्यालयांनी आपल्या परिसरातील उद्योग, व्यवसाय व रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन योग्य विषयांची निवड करावी तसेच त्यासंदर्भातील अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवावेत, असेही निर्देश देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळून ते अधिक कौशल्यसंपन्न व रोजगारक्षम बनतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासन शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी विविध उपक्रम राबवत असून प्रवेश प्रक्रिया, अध्यापन, परीक्षा व मूल्यमापन व्यवस्थेत अधिक कार्यक्षमतेसाठी व्यापक नियोजन करण्यात येत असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
चौकट
परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सर्व महाविद्यालयांच्या परीक्षा केंद्रांवरील वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याकरिता तसेच संबंधित सीसीटीव्हीचे आयपी ऍड्रेस विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाला सर्व परीक्षा केंद्रांवरील परिस्थितीचे थेट निरीक्षण करता येणार आहे. सीसीटीव्हीमुळे कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसण्याबरोबरच परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढून गुणवत्तावृद्धीस मदत होईल, असे संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. श्रीकांत अंधारे यांनी सांगितले.
चौकट
१ जुलैपासून नियमित अध्यापन; कौशल्याधारित शिक्षणावर भर
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी १ जुलै २०२६ पासून सर्व महाविद्यालयांमध्ये नियमित अध्यापन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सर्व वर्गखोल्या व प्रयोगशाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याबाबतही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच एईडीपी अंतर्गत अप्रेंटिस एम्बेडेड डिग्री प्रोग्राम सुरू करण्यासाठी महाविद्यालयांनी योग्य विषयांची निवड करून त्यासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठाकडे सादर करावेत. या उपक्रमामुळे कौशल्याभिमुख, उद्योगाभिमुख व रोजगारक्षम विद्यार्थी घडण्यास मदत होईल. संस्था चालक, प्राचार्य आणि शिक्षकांनी या उपक्रमाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.
Post Views: 233
Previous Post

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

Next Post

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

ताज्या बातम्या

मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

July 26, 2026

सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक; सिंहगडच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक

July 26, 2026

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

July 26, 2026
सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

July 26, 2026
मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

July 26, 2026
साई पब्लिक स्कूलच्या दिंडीने ,विठू नामाच्या गजराने माढा शहर दुमदुमले

साई पब्लिक स्कूलच्या दिंडीने ,विठू नामाच्या गजराने माढा शहर दुमदुमले

July 26, 2026
जिजाऊ गुरुकुल, खांडवीचा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा

जिजाऊ गुरुकुल, खांडवीचा कारगिल विजय दिवस देशभक्तीपूर्ण वातावरणात  साजरा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001226

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!