Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
June 10, 2026
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : महानगरपालिकेच्या क्षयरोग विभागातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्याकडून कर्मचाऱ्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करत विविध कर्मचारी संघटनांनी त्यांच्या तात्काळ बदलीसह कठोर कारवाईची मागणी केली आहे.
       आज दुपारी संबंधित प्रकरणात कर्मचारी ट्रीटमेंट सुपरवायझर सचिन मस्के यांना झालेल्या त्रासामुळे त्यांची प्रकृती बिघडून ते अधिकाऱ्यांच्या दालनातच कोसळल्याचा दावा संघटनांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. एनएचएम कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा विजया कांबळे यांनीही डॉ. हराळकर यांच्याविरोधात अनेक तक्रारी पूर्वीपासून करण्यात आल्या आहेत. डॉ. हराळकर यांच्याकडून कर्मचाऱ्यांना “नासके कांदे”, “हत्ती” आणि “बिनकामाचे” अशा अपमानास्पद शब्दांत हिणवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.  सचिन मस्के यांना चक्कर आल्यानंतरही वैद्यकीय अधिकारी म्हणून आवश्यक मदत न करता त्यांची खिल्ली उडविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी तातडीने निर्णय न झाल्यास महानगरपालिकेतील सर्व आरोग्य कर्मचारी संघटना एकत्र येऊन रुग्णालये बंद ठेवण्याचा इशाराही कांबळे यांनी दिला.
           कामगार नेते जनार्दन शिंदे यांनी सांगितले की, ट्रीटमेंट सुपरवायझर सचिन मस्के यांना गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणाव दिला जात होता. या तणावातूनच त्यांना चक्कर येऊन ते पडले. मात्र, त्यावेळी डॉ. हराळकर यांनी त्यांची विचारपूस करण्याऐवजी “हे ढोंग करत आहेत” अशी टिप्पणी करून तेथून निघून गेल्याचा आरोप त्यांनी केला. अशा वागणुकीतून संवेदनशीलतेचा पूर्ण अभाव दिसून येत असल्याचा आरोप केला.
              कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनीही कर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला. दोन वेळा बदलीचे आदेश होऊनही त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा करत, माझ्याकडे ट्रम्प कार्ड आहे असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.
        दरम्यान, या संदर्भात डॉ. अरुंधती हराळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली बाजू मांडली. संबंधितांनी केलेले आरोप खोटे आहेत. मी गेल्या अडीच वर्षापासून अधिकारी म्हणून हा विभाग नेटक्या पद्धतीने सांभाळत आहे. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत कामाचा व्याप वाढला आहे. काम न करणाऱ्यांना हे रुचत नाही. मी कुणालाही अयोग्य, अपमानास्पद वागणूक दिली नाही. डॉक्टर या नात्याने माझ्यावर चांगले संस्कार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
महापौरांनी दिले कारवाईचे आश्वासन
दरम्यान, कर्मचारी संघटनांनी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, नगरसेविका रोहिणी तडवळकर, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून डॉ. हराळकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा सर्व संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महापौर कोंड्याल यांनी येत्या दहा दिवसात या संदर्भात नियमानुसार कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
Post Views: 227
Previous Post

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

Next Post

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

ताज्या बातम्या

भीमा खोऱ्यातील धरणांतून प्रचंड विसर्ग; उजनी धरण ९०% सकाळपर्यंत होणार

भीमा खोऱ्यातील धरणांतून प्रचंड विसर्ग; उजनी धरण ९०% सकाळपर्यंत होणार

July 26, 2026
मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

July 26, 2026
वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

July 26, 2026

सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक; सिंहगडच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक

July 26, 2026

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

July 26, 2026
सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

July 26, 2026
मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

July 26, 2026
साई पब्लिक स्कूलच्या दिंडीने ,विठू नामाच्या गजराने माढा शहर दुमदुमले

साई पब्लिक स्कूलच्या दिंडीने ,विठू नामाच्या गजराने माढा शहर दुमदुमले

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001233

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!