सोलापूर – पर्यावरणाची जनजागृती, धुळीचे प्रदूषण कमी व्हावे, सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने व पर्यावरणाचा प्रचार व प्रसारासाठी मंगळवार दि. 16 डिसेंबर रोजी दैनिक तरुण भारत कार्यालयाच्या आवारामध्ये सोळा फूट उंचीची झाडे, ट्री ग्रँड सहित कदंब, बकुळ, बूच, कन्हेरी आदी प्रकारांची 28 वेगवेगळी झाडे, पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी, पौर्णिमा कुलकर्णी, सौ. वैद्य यांच्या हस्ते व दैनिक तरुण भारतचे समूह संपादक दिलीप पेठे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. येणाऱ्या काळात 14 कुंड्या रोप सहित देणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
या मध्ये आयुर्वेदिक झाडांची लागवड करण्यात आली. वृत्तपत्र कार्यालयामध्ये झाडे लावल्याने याचा सामाजिक संदेश व जनजागृती मोठ्या प्रमाणात होईल हा प्रमुख उद्देश ठेवून आम्ही वृक्ष लागवड केली. दैनिक तरुण भारतने ही वृक्ष लागवड करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी आभार मानले.
दैनिक तरुण भारतचे समूह संपादक दिलीप पेठे यांनी पर्यावरण तज्ञ दिलीप कुलकर्णी यांना राष्ट्रयज्ञ के सौ वर्ष हे तरुण भारत येथे छापण्यात आलेले पुस्तक भेट देत त्यांचा सत्कार केला.
यावेळी अविनाश बेंजर्पे, यशवंत पाथरूड व माझी वसुंधरा अभियानाचे पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. रुद्रप्पा बिराजदार यांनी गांडूळ खत व शेणखत उपलब्ध करून दिले.
याप्रसंगी अजित कोठारी उद्योजक, महादेव मोघे, सुहास देशपांडे, प्रशांत स्वामी, परशुराम लामतुरे, काशिनाथ गायकवाड, प्रशांत काळे, परशुराम वाघमारे, प्रवीण तळे, दत्ता वाघमारे, वैभव म्हेत्रे आदी वृक्षप्रेमी उपस्थित होते.


















