अकलूज – अकलूज येथील २६५ वर्षांपूर्वीच्या पेशवेकालीन पुरातन काळातील गणपती मंदिर अकलूज येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ असलेले हे मंदिर मंदिर थोरल्या माधवराव पेशवे यांच्या शुभहस्ते चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १८१७ म्हणजेच ६ एप्रिल १७६१ रोजी प्रतिष्ठापना करण्यात आली होती.हे अकलूजमधील पुरातन मंदिर असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे श्री गणेशाची मूर्ती ही संगमरवरी दगडा पासून बनवलेली उजव्या सोंडेची आहे. हा गणपती नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असून या मंदिरामध्ये गणेश याग व इतर धार्मिक कार्यक्रम नेहमी केले जात असतात दररोज व गणेशोत्सव काळात चतुर्थी दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी असते सदरचे मंदिर पूर्वी फार जुने होते वर माळवदाचे छत होते.पूर्वीचे लोक विविध कार्यक्रमाच्या वेळी शेणाने सारवून व स्वच्छता करून धार्मिक विधी करत ब्राह्मण सेवा संघाने पुढाकार घेऊन या मंदिराचा ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट करून दानशूर व्यक्ती व समाज बांधवांच्या सहकार्याने माळवादी बांधकाम काढून स्लॅबचा सभा मंडप बांधला
हा सभा मंडप खराब झाल्याने आता सदर मंदिराचे व शिखराचे जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आलेले आहे नियोजित सभा मंडप हे दोन मजली आहे तर पुरातन जीर्ण झालेले शिखर नव्याने करण्यात येणार आहे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून दानशूर व्यक्ती समाज बांधव यांनी सहकार्य करावे असे आवाहन ब्राह्मण सेवा संघ व श्री गणपती मंदिर ट्रस्ट अकलूज यांच्यावतीने करण्यात आलेले आहे मंदिराजवळ शिवसृष्टी किल्ला बाग, संत वाहत असलेले निरा नदी,पुरातन किल्ल्यातील बुरुजा महादेव मंदिर समोर असलेले श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर शेजारी असलेले दत्त मंदिर आणि अकलूजचे ग्रामदैवत अकलाई देवी कडे जाणारा रस्ता या मंदिरा जवळ असल्याने ही नवीन वास्तू अकलूजच्या वैभवात भर घालेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला
Post Views: 21