Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमाबाई श्राविका विद्यालयात विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण : वार्षिक क्रीडा महोत्सवास जल्लोषात प्रारंभ!

तरुण भारतbyतरुण भारत
December 20, 2025
in sports
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – येथील नामांकित उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचा जल्लोषात प्रारंभ करण्यात आला. 

           यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे तर उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथील प्रा.डॉ. अनिल गहिनीनाथ कांबळे, प्रशालेच्या मार्गदर्शिका दीप्ती शहा, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, प्रशालेचे वरिष्ठ लिपिक कांचन आगावणे सांस्कृतिक भाग प्रमुख माधवी खोत यांची उपस्थिती होती. प्रारंभी प्रशालेच्या सहशिक्षिका सोनाली उंडे व पल्लवी खांडवे यांनी गायलेल्या सुमधुर गीताद्वारे पाहुण्यांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यात आले.राज्य व जिल्हा पातळीवर क्रीडा क्षेत्रात प्रशालेचा नावलौकिक उंचावणाऱ्या खेळाडूंनी आणलेल्या मशालीद्वारे क्रीडाज्योतीचे प्रज्वलन, क्रीडांगणाचे पूजन व हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.इयत्ता आठवी अ व ब तील विद्यार्थ्यांनी आरएसपी, स्काऊट गाईडच्या माध्यमातून शिस्तबद्ध पथसंचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली.

 प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी मनुष्याचे शरीर हीच सर्वात महत्त्वाची संपत्ती असून, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळ खेळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा सप्ताहात खेळ खेळताना खिलाडूवृत्ती दाखवावी असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी प्रा.डॉ.अनिल कांबळे यांचा  परिचय प्रशालेतील सहशिक्षक अनुप कस्तुरे यांनी दिला. प्रशालेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांनी मागील वर्षी प्रशालेने विविध क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या बक्षिसांचे वार्षिक अहवालाच्या माध्यमातून वाचन केले.

 इयत्ता पाचवी, सहावी,सातवीतील विद्यार्थ्यांनी यावेळी आकर्षक अशा शारीरिक कवायत, रिंग कवायत,झेंडा कवायत, घुंगरू काठी कवायत,डंबेल्स यांचे प्रशालेतील सहशिक्षक प्रवीण कंदले यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी नेत्र दीपक सादरीकरण करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.  सोलापूरचे पारंपरिक लोकनृत्य म्हणून लेझीमचा उल्लेख करावा लागतो. सहशिक्षक सुकुमार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीमच्या सादरीकरणाच्या वेळी अक्षरश: विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधान आले होते. सोलापुरी संबळच्या  तालावर विद्यार्थ्यांनी ठेका धरला.यावेळी झांज या कवायत प्रकाराचे इयत्ता नववी अ तील विद्यार्थ्यांनी सहशिक्षक अभिनंदन उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली नयन मनोहर असे प्रात्यक्षिक सादर केले. ब्राझील या परदेशी  नृत्याचे  सादरीकरणही प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सहशिक्षिका पल्लवी खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षण देण्यासाठी कराटे व मन संतुलनासाठी सूर्यनमस्कार,योगाचे धडे दिले जातात. त्याचेही प्रात्यक्षिक यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले. 

          कार्यक्रमाचे उद्घाटक यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतद्वारे अमूल्य असे मार्गदर्शन केले. अशा प्रकारचा क्रीडा महोत्सव यापूर्वी मी पाहिला नसल्याचे सांगून त्यांनी प्रशालीची मुक्तकंठाने प्रशंसा केली. विद्यार्थ्यांनी निरोगी जीवन जगण्यासाठी खेळ खेळलेच पाहिजेत असा सल्लाही त्यांनी दिला.प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी मागील वर्षातील प्रशालेचा क्रीडा क्षेत्रातील प्रगतीचा आलेख(अहवाल)सादर केला. 

      या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा शिक्षक सुहास छंचुरे यांनी कार्यक्रमाची सुंदर नियोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक अभिजीत पाटील तर आभार माधवी खोत यांनी मानले. क्रीडा सप्ताह उद्घाटन समारंभ यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 223
Previous Post

जि. प. अंत्रोळी शाळेच्या गौरीची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड

Next Post

हत्तूर जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

हत्तूर जि. प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात

ताज्या बातम्या

कृषी अधिकारी मधुकर मारकड यांना तिफन कृषी गौरव पुरस्कार

February 16, 2026

शेटफळ प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

February 16, 2026

महाशिवरात्री निमित्त सोरठी सोमनाथ शिवलिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळा

February 16, 2026

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची इगतपुरीला पसंती

February 16, 2026

स्वीकृत नगरसेवक पदाबाबत कुरुहिनशेट्टी समाजाला संधी द्यावी

February 16, 2026

रोटरी रनद्वारे पोलिओ मुक्ती व कॅन्सर जनजागृतीचा सामूहिक संकल्प

February 16, 2026

आयर्न मॅन डॉ. अभिजीत वाघचवरे यांचा युरोप , आफ्रिके नंतर आशिया खंडात डंका

February 16, 2026

वळसंग ते गुड्डापुर पदयात्रा यशस्वीरीत्या संपन्न

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0682596

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697