बार्शी – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड व रोलर बास्केटबॉल स्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने क्रीडा सप्ताह दिनानिमित्त दिनांक २० व २१ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट यश संपादन करुन पूढील होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आहे.
विजयी खेळाडूं पूढील प्रमाणे- १) यशराज रोडे -गोल्ड मेडल २) स्वरा निंबर्गी – सिल्व्हर मेडल, ३) आरव ढोले – सिल्व्हर मेडल ४) अर्णव फल्ले-ब्राँझ मेडल ५) अथर्व भूजबळ – ब्राँझ मेडल.
वरील यशस्वी खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष भगवान जाधव, उपाध्यक्ष/प्रशिक्षक- गणेश रोडे, सचिव – सौ.सविता जाधव, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
तसेच संस्थेच्यावतीने या खेळाडूंचे सौ.स्नेहल रोडे, संचिती जाधव, विश्वजीत जाधव, आदित्य माळी, यश नान्नजकर, सोहम देशमुख, पृथ्वीराज जाधव, नेहा घाडगे या सर्व सहप्रशिक्षकांनी व सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.

















