Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

३९ व्या किशोर-किशोरी (सब ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद खो-खोचा रणसंग्राम मुंबईतस्पर्धेची गटवारी जाहीर

तरुण भारतbyतरुण भारत
December 24, 2025
in sports
0
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने तसेच मुंबई खो-खो असोसिएशन व श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने ३९ वी किशोर व किशोरी (सब ज्युनिअर – १४ वर्षाखालील) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २५ ते २८ डिसेंबर २०२५ या कालावधीत मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. या बहुप्रतीक्षित राज्यस्तरीय स्पर्धेसाठीची गटवारी जाहीर करण्यात आली असून संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण २४ किशोर व किशोरी संघ सहभाग नोंदवणार आहेत.

जेतेपदासाठी रंगणारी चुरस
किशोर गटात गतविजेते धाराशिव तर किशोरी गटात गतविजेते सोलापूर जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मात्र सर्वच गटांत प्रचंड तगडे प्रतिस्पर्धी असल्याने यंदाची स्पर्धा अत्यंत चुरशीची व उत्कंठावर्धक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रत्येक सामन्यात वेग, चपळता आणि डावपेचांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळणार आहे.

उद्घाटन सोहळ्याची तयारी
या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन गुरुवार, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ (भारतीय क्रीडा मंदिर), सहकारनगर, वडाळा, मुंबई येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. उद्घाटनप्रसंगी शिवकुमार लाड (विश्वस्त, श्री समर्थ व्या. मंदिर), पेडणेकर ज्वेलर्सचे आनंद पेडणेकर, प्रा. डॉ. जी. के. ढोकरट (प्राचार्य – बीपीसीए, शारीरिक शिक्षण महाविद्यालय), महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. चंद्रजित जाधव, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा, श्री समर्थ व्या. मंदिर व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे अध्यक्ष अॅड. अरुण देशमुख, प्रमुख कार्यवाह सुरेंद्र विश्वकर्मा यांच्यासह महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे व मुंबई मुंबई खो-खो संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय पातळीचे स्वप्न
या किशोर-किशोरी राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेतून आगामी किशोर व किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूसाठी ही स्पर्धा स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची आणि राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

किशोर गट – गटवारी
अ गट – धाराशिव, बीड, जालना; ब गट – ठाणे, पालघर, जळगाव; क गट – पुणे, रायगड, लातूर; ड गट – सातारा, मुंबई उपनगर, हिंगोली; इ गट – सांगली, नंदुरबार, सिंधुदुर्ग; फ गट – नाशिक, रत्नागिरी, धुळे; ग गट – सोलापूर, मुंबई, परभणी; ह गट – छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नांदेड.

किशोरी गट – गटवारी
अ गट – सोलापूर, रायगड, नंदुरबार; ब गट – धाराशिव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग; क गट – सांगली, छत्रपती संभाजीनगर, लातूर; ड गट – पुणे, पालघर, जळगाव; इ गट – ठाणे, धुळे, परभणी; फ गट – सातारा, मुंबई, हिंगोली; ग गट – नाशिक, मुंबई उपनगर, बीड; ह गट – रत्नागिरी, जालना, नांदेड

ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील उदयोन्मुख खो-खो खेळाडूंसाठी कौशल्य, आत्मविश्वास आणि भविष्यातील यशाचा भक्कम पाया ठरणार असून मुंबईतील क्रीडाप्रेमींना चार दिवस अविस्मरणीय खेळाचा आनंद देणार आहे.

Post Views: 194
Previous Post

यश कदम, ऋतुजा सुरवसे सोलापूर जिल्हा किशोर व किशोरी खो खो संघांचे कर्णधार

Next Post

साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

साने गुरुजी जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

सोलापूर तरुण भारत Short Updates 11

August 5, 2026
नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

नेताजी शिक्षण संकुलास क्रीडा उपसंचालक नाईक यांची सदिच्छा भेट

August 5, 2026
तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेत श्री शंकरलिंग प्रशालेस घवघवीत यश 

August 5, 2026

शहीद पोचिराम  कांबळे यांच्या स्मृतीदिन निमित्य वही वाटप

August 5, 2026
आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

आषाढ महिन्यानिमित्त श्री मरीमातेची गाव जत्रा भक्तिमय वातावरणात सागरी

August 5, 2026
पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना तातडीने बक्षीस रक्कम द्या

August 5, 2026
हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

हॉटेल असोसिएशन बार्शीच्यावतीने नूतन आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार

August 5, 2026
टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीत आणण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध

August 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1029247

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!