कुर्डुवाडी – टेंभुर्णी रोड येथील छत्रपती नगर येथे बंद घराचे की लाॅक कटावणीने उचकटून रोख पंधरा हजार व चांदीच्या मूर्त्या अज्ञात चार चोरट्यांनी लंपास केल्या.ही घटना दि.२६ रोजी पहाटे १.१६ ते १.३३ दरम्यान गडली .सदर चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम उशीरापर्यंत सुरु होते.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी येथील छत्रपरी नगर टेंभुर्णी रोड येथील सुधीर निकम हे आपल्या परिवारासह रा. दि.२५ रोजी रा.१० वा. पंढरपुर येथे एका कार्यक्रमानिमित्त गेले होते व दि.२६ रोजी प.३ वा परत आले .दरम्यान रात्री १ वा १६ मि.दरम्यान तोंडाला बांधून चार चोरटे निकम यांच्या घराकडे गेले. घरात कोणी नसल्याचा अंदाज येताच त्यांनी दरवाजावरील बल्ब काढून दोघाजणांनी कटावणीच्या सहाय्याने की लाॅक तोडून घरात प्रवेश केला.
लोखंडी कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत कपाटातील लाॅकर वाकवून कपाटातील रोख रक्कम व देव्हाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या या चोरट्यांनी चोरून नेल्या ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.रा.१ वा १६ ते १.३३ च्या दरम्यान अवघ्या १७ मिनिटात घडली.यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.























