Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास एकीकडे पंढरपुरातील शेतकर्यांचा बैठक घेऊन विरोध

तरुण भारतbyतरुण भारत
December 28, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. पूर्वीच्या रेखांकानुसारच हा महामार्ग तयार करावा, अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी आज  केली आहे.


हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गात सोलापूर पासून बदल करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी भागातील शेतकर्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याचे सांगत आमच्या जमिनी द्यायला आम्ही तयार असल्याचे सांगितले.

शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ शुक्रवारी (ता.२६ ) पंढरपुरात शेतकर्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांनी शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास विरोध केला आहे. बैठकीला आमदार राजू खरे, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शेकापचे नेते अनिकेत देशमुख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले की शक्तिपीठ महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्ग मंजूर झाल्यानंतर मी स्वतः या भागातील अनेक शेतकऱ्यांना विरोधी भूमिका घेऊ नका असे सांगितले होते. त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती परंतु अचानक सरकारने पंढरपूर सांगोला मोहोळ या भागातून महामार्ग बदलून तो माढा, माण, आणि खटाव या भागातून नेण्याचा विचार सुरू आहे.

पूर्वीप्रमाणेच हा महामार्ग व्हावा अशी आमची मागणी आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच आमच्या मागणीचा विचार करून पूर्वीप्रमाणेच हा महामार्ग करण्यास मान्यता देतील असा आमचा ठाम विश्वास आहे.  शेतकऱ्यांनी सरकारच्या चांगल्या प्रकल्पांना सहकार्य करावे असे आवाहनही परिचारक यांनी केले.
दरम्यान बैठकीनंतर शेतकऱ्यांनी येथील प्रांत कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून प्रांताधिकारी सचिन इथापे यांना निवेदन ही दिले.
——————-
शक्तिपीठ महामार्गामध्ये माझी स्वतःची चार एकर शेती एक विहीर जाणार आहे मी स्वतः या महामार्गासाठी माझी शेती द्यायला तयार आहे. माझ्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने माझी शेती तीन वर्षांपासून पडीक आहे मात्र सध्या सरकारने महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे सरकारच्या निर्णयामुळे आमचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने पूर्वी प्रमाणेच महामार्ग तयार करावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू
विनायक कुलकर्णी, ( समर्थक शेतकरी मांजरी ता.सांगोला )
—————————

दलाल मंडळींनी केली नेते मंडळींची दिशाभुल : भाजपाचे किसान मोर्चाचे सरचिटणीस हळणवर
शक्तीपीठ महामार्ग व्हावा ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. या रस्त्यामुळे महाराष्ट्रा बरोबरच सोलापूर जिल्ह्याचा देखील विकास व्हावा, सर्व शक्तीपीठे या महामार्गाला जोडली जावीत यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता. पण सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केलेला होता. त्यामुळे पूर्वीचे रेखांकन बदलून दुष्काळी पट्ट्यातून नवीन रेखांकन करण्याची भूमिका आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे या त्यांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांमधून स्वागत केले जात आहे. मात्र पंढरपूर मध्ये काही दलाल मंडळींनी येथील नेते मंडळींची दिशाभूल करुन जुन्या रेखाकंनाच्या शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याचे सांगत शुक्रवारी (ता.२६) एक बैठक घेवून नवीन शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ही भूमिका या दलाल मंडळींची आहे. शेतकऱ्यांची नाही. शेतकऱ्यांनी नवीन रेखांकनाचेच स्वागत केल्याचे भाजपाचे किसान मोर्चाचे सरचिटणीस माऊली हळणवर यांनी सांगितले. या बरोबरच  शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ या भागातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान सरकारने जो महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे माण,खटाव आदी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही माऊली हळणवर यांनी सांगितले.

Post Views: 90
Previous Post

“बघून घेतो”ची दमबाजी ठरली वादळी ! आघाडीचा असा ठरला फार्मूला

Next Post

बोअरची मोटार काढताना विद्युत तारेस स्पर्श झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बोअरची मोटार काढताना विद्युत तारेस स्पर्श झाल्याने चार जणांचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011616

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!