सोलापूर – प्रभागातील नागरिकांना जे आम्ही आश्वासन दिलेले आहेत हे काम करण्यासाठी निधीची खूप गरज असते. सातत्याने यापूर्वी आम्ही विरोधकाची भूमिका बजावलेली आहे. विकासाची काम आणि लोकांना दिलेली आश्वासन हे पूर्ण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती माजी नगरसेवक गणेश वानकर यांनी बोलताना दिली.
शिवसेनेच्या माझ्या कोणत्याही सहकाऱ्यांवर मला टीका करायची नाहीये. मला सगळ्या पक्षाकडून ऑफर होती, सगळे पक्ष माझ्याकडे येऊन गेले आहेत. मी एका प्रभागापुरता मर्यादित नसून जिल्ह्याचे नेतृत्व म्हणून जिल्हाप्रमुख काम केलेला आहे. वानकर परिवाराला मानणारा वर्ग आम्ही भाजपमध्ये विलीन केला आहे.येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये मी स्वतः फिरून भाजपला जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी काम करेल. प्रभाग सहा मध्ये गणेश वानकर, सुनील खटके, मृण्मयी गवळी, सोनाली गायकवाड या उमेदवार असतील असेही वानकर यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल वानकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इच्छुक उमेदवारांची नाराजी दूर करणार
प्रभाग सहा मध्ये जे इच्छुक उमेदवार होते, त्यांची नाराजी दूर करू. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढणार असून संपूर्ण पॅनल हा घवघवीत यश मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे.
– सुनील खटके
मिळालेल्या संधीच सोनं करू
जी संधी आम्हाला मिळालेली आहे. त्या संधीचं आम्ही सोनं करू. जे महिलांचे व प्रभागातील नागरिकांचे समस्या असतील ते येणाऱ्या काळात आम्ही सोडवू. रोजगाराची संधी ही निर्माण करू.
– मृण्मयी गवळी


















