सोलापूर – दादांच्या राष्ट्रवादीत लाडक्या ताईंची गळती लागली आहे. शहराध्यक्षांसह युवती अध्यक्षाने पक्ष सोडला आहे. राजीनामा सत्र सत्ताधारी पक्षात नाही तर विरोधी पक्षात सुद्धा पाहायला मिळते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मात्र महिला पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये शहराच्या अध्यक्षा संगीता जोगधनकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. काही महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी सुद्धा राजीनामा नाट्य केले.
आता युवती अध्यक्षाने सुद्धा राजीनामा दिला आहे. किरण माशाळकर यांनी आपल्या युवती अध्यक्षपदाचा राजीनामा देताना पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला आहे. पक्षासाठी युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अन् ऊर्जा निर्माण केली. संघटना वाढीसाठी काम केले.
मात्र निवडणुकीच्या कोणत्याही प्रक्रियेत सहभागी केले गेले नाही, विश्वासात घेतले गेले नाही. या शब्दात माशाळकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या सोबतच्या महिला कार्यकर्त्यांसाठी उमेदवारीची मागणी केली होती परंतु पक्षाचा एबी फॉर्म दिला गेला नाही. असेही त्या यावेळी म्हणल्या.


















