Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कृषी विभाग थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, अधीक्षकांकडून पिकांची पाहणी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in marathwada
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ऊस कापणीनंतर शेतात शिल्लक राहिलेले पाचट जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता जाळण्यासारखे आहे. पाचट न जाळता ते शेतातच कुजवा, ज्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारेल आणि शाश्वत शेतीचा पाया रचला जाईल,” असा संदेश जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिला. मंद्रूप येथे शेतावर आयोजित विशेष प्रात्यक्षिकावेळी भोसले यांनी पाचट व्यवस्थापनाचे फायदे सांगितले. 

  यावेळी कृषी अधीक्षक भोसले म्हणाले की, पाचट कुजल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. ज्यामुळे जमिनीची जलधारण क्षमता सुधारते. याउलट, पाचट जाळल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव आणि मित्रकीटक नष्ट होतात, ज्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होतो. पाचट व्यवस्थापनामुळे रासायनिक खतांवरील खर्चात मोठी बचत होत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना सांगितले.

    यावेळी कृषी अधिकार्‍यांनी प्रसाद शेंडगे यांच्या शेताला भेट दिली. येथे त्यांनी इस्राईल तंत्रज्ञानाचा  वापर करून केलेल्या ऊस लागवडीची पाहणी केली. आधुनिक पद्धतीने लागवड, अचूक खत व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचनाद्वारे पाणी नियोजन केल्यास ऊस उत्पादनात विक्रमी वाढ कशी करता येईल असे भोसले यांनी सांगितले.

  यावेळी विकास वाघमोडे हे ८-१० वर्षांपासून परिसरामध्ये ‘ऊस पाचट कुट्टी’ करून देण्याचे काम सातत्याने करत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

  बदलत्या हवामानात आणि अनिश्चिततेच्या काळात शेतकऱ्यांनी आता केवळ पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता आधुनिक शेतीकडे वळणे काळाची गरज आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास करून केलेली फुलशेती शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी नक्कीच आणू शकते, असा विश्वास तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी व्यक्त केला. पारंपारिक पिकांमध्ये खर्च जास्त आणि उत्पादन मर्यादित असते. त्याऐवजी आधुनिक ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन आणि मल्चिंग पेपरचा वापर करून फुलांचे दर्जेदार उत्पादन घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

      यावेळी मंद्रूपचे सहाय्यक कृषी अधिकारी रमेश फरताडे,. चंद्रकांत कुंभार, प्रसाद शेंडगे , विद्यानंद हिरेमठ, नितीन खराडे ,  प्रकाश वाघमोडे, अनिल खट्टे, महेश कचरे, संगण्णा गुंडके यांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…..

….

कृषी अधीक्षक थेट बांधावर

..,..

शेतकर्‍यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देण्यासाठी व शेतकर्‍यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले व तालुका कृषी अधिकारी अवधूत मुळे यांनी 

थेट  शेतकर्‍याच्या बांधावर पोहोचले. त्यामुळे मंद्रूप परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून,  अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनामुळे आधुनिक शेतीकडे वळण्याचा संकल्प केला आहे.

Post Views: 423
Previous Post

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या रोटरॉक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

Next Post

राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबीराचे आयोजन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबीराचे आयोजन 

ताज्या बातम्या

विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये रोबोटिक्स व AI शिक्षण उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026

भोकरदन मध्ये अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात आला

April 26, 2026

पारध येथे पोलिसांनी एकूण ७९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .

April 26, 2026

ईटमध्ये राष्ट्रवादीचे देशमुख व भाजपाचे गिते या दोन गटात राडा

April 26, 2026

आदर्श विकास घडविणार पालकमंत्री गोरे

April 26, 2026

भावगंधित व्यक्तिमत्वे या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅदमी चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

April 26, 2026

उषा कुलकर्णी यांचे दुःखद निधन

April 26, 2026

सांस्कृतिक सावल्या समीक्षण ग्रंथास प्रा. रसूल सोलापुरे संस्थेचे साहित्य पुरस्कार २०२६ जाहीर

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0831551

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697